वडिलांच्या फिर्यादी वरून कुंटुर पोलिसात मुलाविरुद्ध गुन्हा दाखल
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बरबडा येथे एका महिलेची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना शनिवारी घडली .गोदावरीबाई लिंगोबा वटपलवाड ( वय - ५५ ) अस हत्या झालेल्या दुर्देवी महिलेच नाव असून,शनिवारी सायंकाळी ही घटना उघडकीस आली. दुःखात असलेले पती लिंगोबा वटपालवाड यांनी रविवारी फिर्याद दिल्या नंतर कुंटुर पोलिसात मुला विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून कुंटुर पोलीस आरोपीचा तपास करीत आहेत .
शनिवारी दुपारी मुलगा व आई मध्ये नेहमी प्रमाणे वाद झाला वादाच्या भरात मुलाने आईचा खून केल्याची चर्चा दबक्या आवाजात होत होती. सायंकाळी पाचच्या सुमारास संबंधित महिलेचा पती घरी आल्यावर ही घटना त्यांना कळाली,त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांना या घटनेची माहिती दिली
माहिती समजताच कुंटुर पोलिसांचे एक पथक ताबडतोब घटनास्थळी दाखल झाले .त्यांनी लगेच फॉरेन्सिक टीमला पाचारण केले.घटनेचं वृत्त रात्री उशिरा पर्यंत सुरूच होता.
या बाबद अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता ,संबंधित महिलेच्या डोक्यात खलबत्याने ठेचून अतिशय क्रूरपणे खून करण्यात आला हे उघडकीस आले .यावेळी हत्या झालेल्या महिलेचा एक मुलगा मानसिक रोगी आहे आणि त्यानेच हे कृत्य केल्याची चर्चा गावात सुरू होती.पोलीस तपासात अधिक माहिती उघडकीस येईल असा अंदाज होता तो खरा ठरला मुलगा श्रीनिवास लिंगोजी वटपलवाड वय 24 वर्ष यांनी आपल्या स्वतःच्या आईचा अशा प्रकारची अत्यंत निर्दयी दगडाने ठेचून खून केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.ही घटना बरबडा गावात व नायगाव तालुक्यात पहिल्यांदाच घडल्याने संपूर्ण बरबडा गावावर व नायगाव तालुक्यावर शोककळा पसरली आहे. कुंटुर पोलिसात श्रीनिवास विरूद्ध 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून उपविभागीय पोलीस अधिकारी बिलोली यांच्या मार्गदर्शनाखाली कुंटुर चे सपोनि विशाल बहात्तरे हे आरोपीचा कसून तपास करीत आहेत.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा