राष्ट्रीय स्तरावर निवड झाल्यानंतर परिसरातून शुभेच्छांचा वर्षाव
शिवशाही वृत्तसेवा, पारनेर, (प्रतिनिधी सुदाम दरेकर)
राज्यस्तरीय हापकिडो बॉक्सिंग स्पर्धेमध्ये हॉरिझॉन स्पोर्ट्सच्या खेळाडूंनी ७ मेडल्स मिळवून उत्तुंग भरारी घेतली. शिरूर येथील व्हिजन इंटरनॅशनल स्कूलच्या खेळाडूंनी हे यश मिळवले.
चाकण येथील राजगुरू तालुका क्रीडा संकुलन येथे संपन्न झालेल्या तेराव्या राज्यस्तरीय हाक्कड बॉक्सिंग स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी सहा गोल्ड मेडल आणि एक सिल्वर मेडल पटकावत हे यश संपादन केले.
ऑस्टिन कासी, प्रचिता मुथा, हर्षवर्धन घावटे, रुद्राज मालेगावकर, राजलक्ष्मी वडघुले, गौरी ढवळे यांनी सुवर्णपदक मिळवत यश संपादन केले तर श्रीशा घावटे हिने रौप्य पदक मिळविले. या राज्यस्तरावर यशस्वी झालेल्या खेळाडूंची निवड नॅशनल लेव्हल स्पर्धेसाठी झाली. यांना हॉरिझॉन स्पोर्ट्सच्या राजेश्वरी कोठावळे यांनी मार्गदर्शन केले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा