उच्चशिक्षित तरुणाच्या जाण्याने टाकळगावात हळहळ
नायगाव तालुक्यातील टाकळगाव येथील योगेश गंगाधर गिरी वय 20 वर्ष हा तरुण दोन दिवसापूर्वी घरातून बाहेर पडला. सायंकाळी घरी न आल्याने घरच्या मंडळींनी त्याची शोधाशोध केली. सोशल मीडियावर मुलगा हरवल्याची पोस्ट करण्यात आल्या. तसेच मित्रपरिवार व नातेवाईक या सगळ्यांना सांगितले. सगळीकडे शोध घेतला परंतु तो सापडला नाही. मंगळवारी सकाळी नात्यातील व्यक्ती शेताकडे केली होती त्यावेळी त्यांना त्यांच्याच शेतातील विहीरीत तो तरुण तरंगताना दिसला. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणाच्या जाण्याने टाकळगाव व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
टाकळगाव येथील गंगाधर गिरी यांना दोन मुले असून मोठा मुलगा, योगेशला बारावी पास झाल्यानंतर पुर्णा येथे BAMS ला प्रवेश मिळाला होता. सन 2022 मध्ये प्रवेश मिळाल्यानंतर नियमित काँलेज करत होता. काही दिवसांपूर्वी तो गावाकडे आला होता. घरी बसून करमत नसल्याने दररोज दोन तीन तास शेताकडे फेरफटका मारुन येत होता. मात्र रविवारी दुपारी शेतात गेलेला योगेश रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने घरातील मंडळींनी शोधाशोध केली, पण तो सापडला नाही. सोमवारी दिवसभर शोध घेण्यात आला पण कुठेही ठावठिकाणा लागला नाही. त्यामुळे आई वडिलांची चिंता वाढली.
उच्चशिक्षित युवक गायब असल्याने घरच्या मंडळीसह गावही चिंतेत होते. सगळीकडे शोधाशोध केली. सोशल मीडियावर देखील पोस्ट करुन संपर्क साधण्याचे आवाहन केले. परंतु शोध लागला नाही. नातेवाईकांचा शोध सुरुच होता. दरम्यान मंगळवारी सकाळी नातेवाईकांना घरच्याच शेतातील विहिरीत एक तरुण तरंगताना दिसला. या घटनेची माहिती नायगाव पोलीसांना कळविण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. ही आत्महत्या आहे की घातपात की अपघात याबाबत स्पष्टता झाली नाही. पोलीस निरीक्षक जयप्रकाश गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मुस्तापुरे हे अधिक तपास करत आहेत.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा