28 सप्टेंबरआंतरराष्ट्रीय माहितीचा अधिकार दिवस म्हणून साजरा करण्यात यावा
शिवशाही वृत्तसेवा, पारनेर (प्रतिनिधी सुदाम दरेकर)
28 सप्टेंबर 2023 हा दिवस आंतरराष्ट्रीय माहितीचा अधिकार दिवस म्हणून अहमदनगर जिल्ह्यामध्ये साजरा करण्यात यावा त्यासंदर्भातले निवेदन योगेश कुलथे यांच्याकडून जिल्हाधिकारी कार्यालय यांना देण्यात आलेले आहे. निवेदनामध्ये असे म्हटले आहे की 28 सप्टेंबर हा दिवस राज्य पातळीवरती प्रतिवर्षी माहितीचा अधिकार दिन म्हणून साजरा करण्यात यावा तसेच या दिवशी शालेय शिक्षण विभाग तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभागाने सर्व शाळा महाविद्यालय विद्यापीठे व इतर शैक्षणिक संस्थांमध्ये माहितीचा अधिकार या विषयावरती आधारित प्रश्नमंजुषा चित्रकला निबंध व वकृत व इतर सारख्या स्पर्धा चर्चासत्र व्याख्यानमाला आयोजित करण्यासाठी आपल्या स्तरावरून जिल्हाभर प्रयत्न करण्यात यावे.
तसेच स्थानिक स्वराज्य संस्था व अशासकीय समाजसेवी संस्थांच्या माध्यमाने सामाजिक समाज कार्यकर्त्यांनी करता तसेच गाव पातळीवर ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये माहितीचा अधिकार दिन साजरा करून माहितीच्या अधिकार कायद्याविषयी ग्रामस्थांना तसेच सर्व समाज बांधवांना माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत चालणारे कामे हे प्रबोधन करण्यात यावे त्यामुळे माहितीचा अधिकार कायदा बळकट होऊन त्यामधून भ्रष्टाचारावरती नियंत्रण बसेल व कायद्याची माहिती आम जनतेपर्यंत जाईल तसा शासनाने जीआर काढून यासंबंधीतले सर्व कामे करण्यासाठी जिल्हाधिकारी यांना आदेशित केलेले आहे तरी जिल्हा अधिकारी साहेब यांनी 28 सप्टेंबर 2023 हा दिवस अहमदनगर जिल्ह्यामध्ये विविध माध्यमांच्या सहाय्याने तसेच ग्रामपंचायत कार्यालय व इतर शासकीय कार्यालयांमध्ये साजरा करण्यात यावा असे निवेदनामध्ये म्हटले आहे
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा