maharashtra day, workers day, shivshahi news,

रिक्षा विहिरीत कोसळून नवदाम्पत्याचा करूण अंत

सासवड-जेजुरी पालखी महामार्गावर दुर्दैवी घटना
A rickshaw fell into a well and the newlyweds met a pitiful end, Accident on Saswad-Jejuri Palkhi Highway, saswad, jejuri, pune, shivshahi news

शिवशाही वृत्तसेवा, पुणे (जिल्हा प्रतिनिधी अभिषेक जाधव)
पुणे दि- 26 सासवड-जेजुरी पालखी महामार्गावर खळद बोरावके मळा येथे रिक्षा विहरीत पडल्याची घटना समोर आली आहे. अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. 
मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील धायरीहून जेजुरीच्या खंडोबाच्या देवदर्शनाला निघालेली रिक्षा विहिरीत पडल्याने एका तरुणीसह नवदाम्पत्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सासवड-जेजुरी पालखी महामार्गावर खळद बोरावके मळा येथे हा दुर्देवी अपघात घडला. 
सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हा दुर्देवी अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. व्यायामाला आलेल्या तरुणांना विहिरीतून वाचवा, वाचवा असा आवाज आला. यावेळी त्यांनी विहिरीत पाहिले असता हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. याबाबतची माहिती तत्काळ सासवड पोलिसांना देवून रिक्षासह दोघांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. रिक्षा चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट विहिरीत कोसळल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या अपघातात मृतांमध्ये दोन दिवसांपूर्वी लग्न झालेल्या नवदांपत्याचाही समावेश आहे. संसाराची सुरूवात होण्यापुर्वीच असा दुर्देवी शेवट झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !