केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ट्विट करून दिली माहिती
आज फिर जीने की तमन्ना है। आज फिर करने का इरादा है।
हे गाणे रेडिओवर वाजू लागले की तमाम चित्रपट रसिकांच्या डोळ्यासमोर वहिदा रहमान यांच्या तरल अभिनयाने नटलेला गाईड हा चित्रपट झळकू लागतो. भारतीय चित्रपट सृष्टीत अनेक चित्रपट असे होऊन गेले की त्यांनी रसिकांच्या आणि सर्वसामान्यांचे मनावर आधी राज्य केले. त्यातील कलाकारांनी लोकप्रियतेची शिखरे सर केली.
अशाच लोकप्रियतेच्या उत्तुंग लाटेवर स्वार झालेल्या अभिनेत्रींपैकी एक आहेत वहिदा रहमान. शालीन सुंदर रूप, अतिशय भावुक आणि बोलके डोळे, आणि रसिकांना खिळवून ठेवणारी अभिनय क्षमता यामुळे वहिदाजी चित्रपट रसिकांच्या आवडत्या अभिनेत्री बनल्या आहेत. गाईड, प्यासा, चौदहवीं का चाँद, कागज के फूल, साहिब बीबी और गुलाम, तीसरी कसम यांसारख्या अनेक चित्रपटातून वहिदा रहमान यांनी भारतीय सिनेमाला आपल्या अभिनयाने वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. अशोक कुमार, राज कपूर, देवानंद, यांच्यासारख्या अभिनेत्यांबरोबर व इतर रहमान यांनी रुपेरी पडदा गाजवला आहे.
त्यामुळेच वहिदा रहमान यांना चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्च समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. सभागृहात महिला आरक्षण बिल मंजूर होत असताना नारीशक्तीला वंदन केले जात आहे त्याच वेळी वहिदा रहमान यांना चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्च दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार जाहीर करताना मला अभिमान वाटतो. वहिदा रहमान यांनी चित्रपट क्षेत्राला दिलेल्या भरीव योगदानाबद्दल हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे असे केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा