खंडगाव येथे यशस्वीरित्या पार पडला उपक्रम
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
सहभागी ग्रामीण मूल्यमापन (PRA) हा एक मूल्यांकन आणि शिकण्याचा दृष्टीकोन आहे जो स्थानिक लोकांना त्यांच्या स्वतःच्या राहणीमानाची परिस्थिती, समस्या आणि संभाव्यतेचे विश्लेषण करण्यासाठी सक्रिय भूमिका स्विकारण्यासाठी सक्षम बनविण्यावर भर देतो. (PRA) हा ग्रामीण जीवन आणि परिस्थितीबद्दल ग्रामीण लोकांकडून आणि त्यांच्याकडून शिकण्याचा दृष्टीकोन आणि पद्धत आहे.
PRA विश्लेषण, नियोजन आणि कृतीमध्ये विस्तारित आहे. PRA या प्रक्रियेत गावकरी आणि स्थानिक अधिकाऱ्यांना जवळून सहभागी करून घेते. यामध्ये विद्यार्थ्यांनी खंडगाव या गावाची माहिती गोळा करून त्या गावचा नकाशा काढला त्यामध्ये त्यांनी गावचे रस्ते, शाळा,पाण्याचे स्त्रोत, लागवडीखालील जमीन इत्यादी गोष्टी दाखवण्यात आल्या व त्याविषयी विद्यार्थ्यांनी गावकऱ्यांशी चर्चा केली.
हे सहभागी ग्रामीण मूल्यमापन (PRA) यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी योगेश हिवराळे,अनुराग मस्के,अमोल कदम,सुनिल कराळे,गजानन माने,बजरंग कदम, विशाल हिंगमिरे,प्रथमेश कुरमे,रोहित कंधारे,ओमकार जगदंबे,सचिन कोकाटे, विकास जाधव,संकेत कदम,ओमकार मडावी,रुपेश महालिंगे या नायगांव (बा.)कृषी महाविद्यालयातील सर्व कृषीदुतांनी अथांग परिश्रम घेतले. तसेच मूल्यमापन रावे कार्यक्रम समन्वयक प्रा. शंकर नागणीकर, रावे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. शरद शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.यावेळी कृषी महाविद्यालय नायगाव (बा),चे उपप्राचार्य प्रा.डा. नागेश घुबे, रावे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ तोटेवाड, गावचे सरपंच व समस्त गावकरी उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा