उपाध्यक्षपदी साईनाथ बैलके यांची निवड
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
नायगाव तालुक्यातील आलुवडगाव येथील सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार काॅ.नागोराव पा.बंडे यांची अखिल भारतीय किसान मजदूर सभा (ए.आय.के.एम.एस. ) च्या नायगाव तालुका अध्यक्ष पदी अखिल भारतीय मजदूर सभा केंद्रीय महासचिव (ए.आय.के.एम.एस.) काॅ.अशोक घायाळे यांच्या हस्ते निवड करण्यात आली.
तर उपाध्यक्ष पदी काॅ.साईनाथ बैलके,ता.सचिव काॅ.चांदू झुंजारे,ता.सहसचिव काॅ.चोपवाड खाकिबा कार्लेकर,ता.सदस्य काॅ.देविदास पा वडजे टेंभुर्णीकर,काॅ.सदा पा.रातोळीकर, काॅ.गंधकवाड नरबा मुगावकर,काॅ.गणेश भांगे गडगेकर,काॅ.गोविंद राठोड,काॅ.बळी पा.ईगोंले,काॅ.पिराजी ईरेवाड यांची निवड करून पुष्पगुच्छ देऊन भावी कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी अखिल भारतीय किसान मजदूर सभा (ए.आय.के.एम.एस.) केंद्रीय महासचिव काॅ.अशोक घायाळे,काॅ.रावसाहेब बैलके,काॅ.शरद घायाळे,काॅ.शिवाजी घायाळे,काॅ.ज्ञानेश्वर पोटफोडे, काॅ.गोविंद चादगिळे,आदी उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा