लाडक्या बाप्पाला मोठ्या थाटामाटात निरोप
शिवशाही वृत्तसेवा, जिल्हा प्रतिनिधी , सुदाम दरेकर पारनेर
43 वर्षाची परंपरा जपलेल संघर्ष मित्र मंडळ पळवे खुर्द मठवस्ती मंडळाने याही वर्षी मोठ्या थाटामाटात गणेशोत्सवाची स्थापना केली होती दररोज सकाळी साडेसात आणि संध्याकाळी साडेसात मान्यवरांच्या उपस्थितीत महाआरती संपन्न होत असे त्यानंतर दररोज माता-भगिनी बालगोपाळांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत होते विजेत्या स्पर्धकांना रोख बक्षीस देऊन सन्मानित करण्यात येत होते.
सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये संगीत खुर्ची ,लिंबू चमचा आणि खास माता भगिनींच्या आकर्षण ठरलेल्या तळ्यात मळ्यात ,नेमबाजी ,आणि फुगे फोडणे , चालता बोलता, अंताक्षरी या कार्यक्रमांनी सर्वांना आनंदित केले .अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशी गणरायाची सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली होती त्यानंतर संघर्ष मित्र मंडळाच्या वतीने सामुदायिक महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते अनंत चतुर्थीच्या दिवशी डीजेच्या तालावर विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली.
आणि या विसर्जन मिरवणुकीमध्ये आनंदाने उत्साहाने सर्व तरुणाई त्याचबरोबर अबालवृद्ध माता भगिनी, बालगोपाळ सर्वांनी विसर्जन मिरवणुकीचा आनंद घेतला गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात संपूर्ण मठवस्ती परिवार सहभागी झाला होता संघर्ष मित्र मंडळाचे अध्यक्ष पळवे खुर्द गावचे माजी उपसरपंच श्री संजयजी नवले सर यांच्या शुभहस्ते विसर्जन महाआरती संपन्न झाली त्यानंतर प्रसादाचे वाटप झाले. या क्षणी काही बालगोपाळ, वृद्ध माता भगिनी, तरुण बांधव यांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू होते. अश्रू आवरत सर्वांनी लाडक्या बाप्पाला निरोप दिला.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा