व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल पोलिसांचे मात्र कानावर हात
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटुंरकर)
तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिमायतनगर शहरात ठीक ठिकाणी मटका खुलेआम चालत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल झाले आहे या अवैध मटका व जुगार चालवणार्याला कारणीभुत कोण ? अस प्रश्न शहरातील कष्ठकरी महिला व तरुण वर्गातुन होत आहे.
aaaa
शहरात ठीक ठिकाणी राज रोस पने जुगार व मटका अड्डे सुरू आहेत ह्याला स्थानिक पोलिसाचे अभय असल्याचे शहरात बोलल्या जात आहे काही ठराविक मटका घेणार्या नौकरावर वरिष्ठांचा दबाव आल्याने तात्पुरती कारवाई करुन पोलिस प्रशासन मोकळे होत असल्याचे शहरात नेहमी बोलल्या जात आहे पण गब्बर मटका किंग वर अद्याप कारवाई झाली नसल्याने येथील पोलिस प्रशासनावर शंका व्यक्त केली जात आहे.गेल्या कित्येक दिवसांपासून शहरातील चौपाटी उमर चौक व पोलीस स्टेशन परिसरासह इतर ठिकाणी मटका चालत असुन यावर लगाम लाण्यास असमर्थ असलेल्या हिमायतनगर पोलिस ठाण्यामुळेच मटका जुगार फोपावला असल्याची ओरड नागरिक मधून होत आहे.याकडे वरिष्ठ पोलीस अधीक्षक साहेब सह L.C.B. च्या यंञणेने सुध्दा लक्ष देवून दखल घेणे गरजेचे असल्याचे शहरातील जाणकार नागरिकांकडून बोलल्या जात आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा