मनसेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
शिवशाही वृत्तसेवा, लातूर (जिल्हा प्रतिनिधी उदयकुमार पाठक)
लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा यासाठी मनसेच्या वतीने लातूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. तसेच आठ दिवसाच्या आत शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखाची मदत करा आणि तात्काळ पीकविमा मंजूर करा तसेच वन्य प्राण्यांपासून शेतीची सुरक्षाव्यवस्था करा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. मागण्या मान्य झाल्या नाहीत तर महाराष्ट्र सैनिक व शेतकरी बांधव रस्त्यावर उतरून राज्यभर आंदोलन करतील असा इशारा मनसे सरचिटणीस तथा मनसे शेतकरी सेना प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे यांनी दिला आहे .
यावेळी डॉ नरसिंह भिकाणे, शिवकुमार नागराळे, संजय राठोड, भागवत शिंदे, मनोज अभंगे, रवी सूर्यवंशी, सचिन सिरसाट, प्रीती भगत, किरण चव्हाण, अंकुश शिंदे, वाहिद शेख, सचिन बिराजदार, संग्राम रोडगे, महेश बनसोडे, सोमनाथ कलशेट्टी, महेश देशमुख, श्रीनिवास शिंदे, महेश माने, अनिल जाधव, रामदास पाटील, संतोष भोपळे, सुनील तोडचीरकर, परमेश्वर पवार, जहांगीर शेख, बजरंग ठाकूर, अजिंक्य मोरे, ऋषिकेश माने, संतोष जाधव, शुभम चंदनशिवे, रामदास तेलंगे, गुरुदास घोणसे, अनिल भंडे, पवन राजे, दत्ता म्हात्रे, लाला मोहिते, पवन सरवदे, सचिन इगे, सुरेश गालफाडे, चेतन चौहान, संभाजी सिरसाट, प्रमोद आंबेकर, विशाल कातळे, लक्ष्मण लांडगे, प्रमोद कांदे, महेश नागरगोजे, शिवराज सिरसाट, अंगद खलग्रे, नरेश कांदे, रवी वाघमारे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा