फोटोविश्व पुरस्कार सोहळ्याचे आयोजन
![]() |
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (प्रतिनिधी)
पंढरपूर फोटोग्राफर विकास मंचाच्या वतीने जागतिक छायाचित्रकार दिनाच्या निमित्ताने फोटो विश्व पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. फोटोग्राफिक क्षेत्रातील डिझायनर, लॅब ऑपरेटर, पोस्ट प्रोडक्शन, करणाऱ्या कलाकारांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
युटोपीयन शुगरचे चेअरमन उमेश परिचारक, विठ्ठल शुगरचे चेअरमन अभिजीत पाटील, सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे, मनसे नेते दिलीप धोत्रे, माजी सभापती विजयसिंह देशमुख, आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
प्रथम मान्यवरांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणी व कॅमेरा पूजन तसेच दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. फोटोग्राफर विकास मंचाचे बशीर शेख यांनी आपल्या प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा हेतू विशद केला. त्यानंतर फोटोग्राफर विकास मंचाच्या वतीने मान्यवर पाहुण्यांचा स्वागतपर सत्कार करण्यात आला. तसेच सम्राट भाळवणकर, रविकिरण जोशी, आणि योगेश आराध्ये यांना फोटोविश्व पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शाल श्रीफळ पुष्पहार आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.
आम्ही स्वतः फोटोग्राफी करत नसलो, तरी फोटोग्राफी क्षेत्राचा भाग आहोत. गेली अनेक वर्ष या क्षेत्रात काम करताना आज आमच्या कामाची दखल घेतली गेली, त्यामुळे कामाचे सार्थक झाल्याच्या भावना, सत्कारमूर्तींनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केल्या.
मनसे नेते दिलीप धोत्रे, चेअरमन अभिजीत पाटील, चेअरमन कल्याणराव काळे, व चेअरमन उमेश परिचारक, या मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत छायाचित्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि समाजातील फोटोग्राफरचे महत्व किती आहे हे देखील सांगितले.
रेखा चंद्रराव यांनी या छोटेखानी परंतु स्नेहपूर्ण कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन केले, तर सचिन कुलकर्णी यांनी उपस्थितांचे आभार मानले. या पुरस्कार सोहळ्याला पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला, शहर व परिसरातील फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर, तंत्रज्ञ, लॅब मालक इत्यादी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बशीर शेख , श्रीकांत लवेकर, देवकर सर व फोटोग्राफर विकास मंचाच्या सर्व सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. गणेश गोडबोले यांच्या स्वरांजली कार्यक्रमाने या सोहळ्याची रंगत वाढवली.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा