दोन दिवसांपासून जखमी अवस्थेत फिरतोय राष्ट्रीय पक्षी
शिवशाही वृत्तसेवा नांदेड, (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटुंरकर)
नायगांव तालुक्यांतील मुस्तापूर शिवारात जखमी अवस्थेत असलेले मोर सध्या शेतकरी नागरिकांना आढळून येते आहेत असाच गावातील तरुण राहुल गायकवाड यांच्या शेतालगत असलेल्या झुडपात स्लग दुसऱ्याही दिवसी जखमी मोर आढळून आल्याने सदरील तरुण गावातील सरपंच व ग्रामस्थांना माहिती दिली .
लगेच वनविभागाना कळवून वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी निखिल हिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी वनपरिमंडळ अधिकारी एम डी गुरूपवार वनसेवक श्री राजू भालेराव यांनी गावात येऊन सदरील जखमी असलेल्या मोराना नायगाव येथील लघू तालुका सर्व चिकित्सालय डॉ सुधाकर साळवे यांनी उपचार करून वनविभागाच्या स्वाधीन केले राष्ट्रीय पक्षी म्हणून संबोधले जाणाऱ्या मोर पक्षाचे जिवन वाचवून वनविभागा व गावकऱ्यांनी जंगलात सोडून दिले
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा