ग्रामसचिवालय, ३३केव्ही सबस्टेशन, आणि रस्त्यांची मागणी
शिवशाही वृत्तसेवा, पारनेर (प्रतिनिधी सुदाम दरेकर)
पळवे खुर्द मधील ग्रामस्थांनी आमदार निलेश लंके यांच्याकडे विविध कामांची निवेदन देवून मागणी केली आहे यामध्ये नवीन ग्रामसचिवालय, नवीन ३३ केव्ही सबस्टेशन,तसेच गावठाण ते इरकरमळा रस्ता, गावठाण ते मठवस्ती रस्ता, पाचारणेमळा ते बारगळ वस्ती रस्ता हे रस्ते काँक्रीटीकरण/डांबरीकरण करणे, व गावठाण ते पाचरणे मळा व गावठाण ते देशमुख मळा रस्ता दुरुस्ती करणे, तसेच, दरेकर मळा शिंदेमळा शेळकेमळा, बारगळ वस्ती कान्होबामाळ, इरकर मळा,शेळकेवस्ती,तरटे वस्ती, पाचरने मळा अश्या एकूण ४ सिंगल फेज डीपी, देशमुख मळा,मठवस्ती अंतर्गत येणारे रस्ते काँक्रीटीकरण करणे, घानेगाव शिवपानंद रस्ता,स्मशानभूमी वॉलकंपौंड करणे व आता सुरू असलेल्या जलजिवन या योजनेचा फेर सर्व्हे करून मंजुरी मिळणे या संदर्भात कामांची मागणी निवेदनात करण्यात आली.
यावेळी आमदार लंके म्हणाले की पळवे खुर्द ग्रामस्थांनी नेहमीच मला आणि मला मानणाऱ्या कार्यकर्त्यांना नेहमीच बळ दिले आहे.प्रसाद तरटे सारखा उमदा सहकारी तरुणांच्या संघटनाच्या जीवावर गावच्या विकासासाठी झोकून देवून काम करत आहे अश्या तरुणांची समाजाला गरज आहे असे आमदार लंके यावेळी म्हणाले त्यामुळे त्यांच्या कामांच्या मागण्यांकडे विशेष लक्ष देवून गावाच्या विकासासाठी भरीव निधी देण्यासाठी येत्या काळात मी बांधील राहील.
या वेळी सरपंच प्रसाद तरटे,माजी सरपंच रामदास तरटे,सैनिक बँकेचे संचालक संजय तरटे,माजी उपसरपंच तात्यासाहेब देशमुख,माजी चेअरमन रोहिदास नवले,विद्यमान चेअरमन अंबादास तरटे,विश्वस्त पंडितराव देशमुख, माजी चेअरमन विलास तरटे मेजर,माजी उपसरपंच संजय नवले, उपसरपंच अमोल जाधव, ग्रां.प.सदस्य.विजयशेठ शेलार तात्याभाऊ शेळके सर, ठकाजी तरटे,गुजाबापू पाचरणे,माधव शेलार,आबा इरकर, भिमाजी शेळके राजेंद्र शेळके,सोपान पवार,संभाजी पाचर्णे,भाऊसाहेब तरटेमेजर,विठ्ठल देशमुख, शंकर गवळी,रवींद्र नवले,राजेंद्र शेलार,शांताराम तरटे, नवनाथ तरटे,अशोक गवळी,प्रदीप तरटे,दत्ता देशमुख,शांताराम देशमुख,पोपट पाचरणे,,नंदू गवळी,मारुती तरटे, नंदू गाडीलकर प्रसाद जगताप,अमोल तरटे नितीन गुंड,सतीश शेळके, व अमोल शेळके आदी उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा