योगेश बबन कुलथे यांच्या कामाची दखल
शिवशाही वृत्तसेवा, पारनेर (प्रतिनिधी सुदाम दरेकर)
भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश चे संस्थापक अध्यक्ष माननीय भाऊसाहेब कांबळे यांनी अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष योगेश बबन कुलथे यांच्या कामाची दखल घेऊन त्यांची अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष पदा वरून बढती केली आहे. त्यांना जिल्हा अध्यक्ष पदाचे नियुक्तीपत्र प्रकाश खैरमोडे यांच्यामार्फत देण्यात आले आहे.
समाजातील छोट्या मोठ्या भ्रष्टाचारापासून मोठ्या पर्यंत ही संघटना आवाज उठवत आहे. त्यामुळे संघटनेला लोकांचे मोठ्या प्रमाणात समर्थन मिळत आहे. अशा संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने योगेश कुलथे यांचे संघटनेच्या वतीने व ग्रामस्थांच्या वतीने त्यांना पुढील वाटचालीसाठी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा