अखंड २३ वर्षे सुरू आहे सप्ताहाची परंपरा
प्रतिनिधी : सुदाम दरेकर पारनेर
दिनांक 17 गुरुवार रोजी पासून श्री. क्षेत्र मारुती मंदिर पळवे खुर्द येथे ह भ प. पु. वै. रामदास महाराज साबळे यांच्या कृपाशीर्वादाने तसेच ह.भ.प.शिवानंद महाराज नांगरे यांच्या प्रेरणेने व समस्त ग्रामस्थ पळवे खुर्द यांच्या सहकार्याने सुरू झालेला अखंड हरिनाम सप्ताह व या ठिकाणी हा सोहळा प्रारंभ झाला आहे. या ठिकाणी ज्ञानेश्वरी पारायण, काकडा, भजन, तुकाराम गाथा भजन, हरिपाठ, हरी किर्तन,हरी जागर, हे अखंड हरिनाम सप्ताहाचे 23 वे वर्ष आहे. तसेच या ठिकाणी पहारा व चोपदार व्यवस्था ही चोख ठेवण्यात येणार आहे. तसेच या ठिकाणी पळवे खुर्द, मठ वस्ती,बाबुर्डी, पळवे बुद्रुक, वाघुंडे, बसणे सुलतानपूर, घाणेगाव,जातेगाव इत्यादी भजनी मंडळाचा हरिजागर होणार आहे. या ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरुवार दिनांक 17 रोजी ह. भ.प. बाळकृष्ण महाराज सोनुळे (वडनेर )यांचे कीर्तन झाले आहे. दिनांक 18 शुक्रवार रोजी ह भ प प्रा. अशोक महाराज शिंदे (डिक्सळ ) यांचे कीर्तन आहे. शनिवार दि. 19 रोजी ह भ प गुलाब महाराज करंजुले सर (पाडळी ) यांचे कीर्तन आहे. रविवार दि. 20 रोजी ह भ प गोरख महाराज बनकर (रांजणगाव मशीद ) यांचे कीर्तन आहे. सोमवार दि. 21 रोजी ह भ प सोमनाथ महाराज बारगळ सर (पळवे खुर्द) यांचे कीर्तन आहे. मंगळवार दि.22 रोजी ह भ प रामेश्वर महाराज मस्के (चांडगाव ) यांचे कीर्तन आहे. बुधवार दि. 23 रोजी ह भ प ज्ञानेश्वर महाराज पिंपळे (पाबळ ) यांचे कीर्तन आहे. तसेच गुरुवार दिनांक 24 रोजी सकाळी 9 ते 11 या वेळेत ह भ प समाधान महाराज शर्मा भागवताचार्य (केज बीड) यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. व नंतर महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता होईल अशी माहिती पळवे खुर्द येथील ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आली आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा