श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्यावर अपघात विषयक प्रबोधन
शिवशाही वृत्तसेवा, मंगळवेढा (प्रतिनिधी, राज सारवडे)
वाहतुकीचे नियम पाळुन सर्व सामान्य जनतेला रस्ते अपघातापासुन सुरक्षीत ठेवणेची जबाबदारी समाजातील सर्व घटकानी घेतली पाहिजे असे मत मंगळवेढयाच्या पोलिस निरिक्षक श्रीमती नयोमी साटम (आय.पी.एस.) यांनी श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्यावर अपघात विषयक प्रबोधन करताना व्यक्त केले. पुढे बोलताना श्रीमती नयोमी साटम म्हणाल्या की, साखर कारखाने चालु असताना मोठया प्रमाणात व रात्रंदिवस ऊस तोडणी वाहतुकीचे काम चालु असते. त्यामुळे ट्रक, ट्रॅक्टर, बैलगाडी, डंपींग गाडी यांचे अपघात होण्याचे प्रमाण वाढते. यासाठी वाहन चालकांना वाहतुकीचे नियम समजावुन सांगणे, त्यांना शिस्त लावणे इत्यादी जबाबदारी यंत्रणेवर नियंत्रण ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांची आहे.
रात्रंदिवस वाहतुकीचे काम चालु असल्याने अंधारातुन प्रवास करावा लागतो. यासाठी वाहनांना रिप्लेक्टर लावुन घ्यावेत. वाहनांच्या नंबर प्लेट स्पष्ट दिसेल अशा लावाव्यात. ड्रायव्हरचे लायसन्स वाहनांचा इन्शुरन्स व सर्व कागदपत्रे तपासुन घ्यावीत. वाहनांवर मोठया कर्कष आवाजात गाणी लावुन ड्रायव्हर वाहन चालवत असल्याने अपघात होतात. अशा वाहन चालकाना वाहन चालवताना गाणी न लावणेबाबत योग्य त्या सुचना द्याव्यात. कारखान्याचे फायर ऑडिट करुन घ्यावे. सर्व कामगारांची वैयक्तीक माहिती, पत्ता कारखान्याकडे असणे गरजेचे आहे. यापुढे मंगळवेढा शहरातुन जड वाहतुकीस बंदी घालण्यात आलेली आहे. त्यामुळे वाहतुक सुरळीत होवुन अपघाताचे प्रमाण कमी होणार आहे. यासाठी आावश्यक ठिकाणी कारखान्याने सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसवुन घ्यावेत. गरज पडल्यास पोलीस खाते मदत करणेस तत्पर असलेचे त्यांनी सांगीतले.
कारखान्याचे चेअरमन श्री शिवानंद पाटील यांनी श्रीमती साटम मॅडम यांचा शाल व श्रीफळ देवुन सत्कार केला व आपल्या मनोगतामध्ये म्हणाले कि, कारखान्याकडील ऊस वाहतुक यंत्रणेला आवश्यक सुचना देण्याचे काम हंगामाचे सुरुवातीला करित आहोत. तसेच पोलीस विभागामार्फत सुरक्षा सप्ताहाचे नियोजन करुन वाहन मालक व ड्रायव्हर यांचे शिबीर घेवुन त्यांमध्येही वाहतुकीचे नियम सांगुन दरवर्षी प्रबोधन केले जाते. ऊस वाहतुकीचे काम करणाऱ्या सर्व वाहनांना कारखान्यामार्फत रिप्लेक्टर बसवणेत येत आहेत. पोलीस खात्याने हंगाम चालु असताना मदत करणे आवशक असलेचे मत व्यक्त केले.
सदर कार्यक्रमासाठी कारखान्याचे व्हा.चेअरमन श्री तानाजीभाऊ खरात, संचालक सर्वश्री मुरलीधर दत्तू, गौरीशंकर बुरकूल, गोपाळ भगरे, राजेंद्र चरणू पाटील, भारत बेदरे, दयानंद सोनगे, औदुंबर वाडदेकर, रेवणसिध्द् लिगाडे, बसवराज पाटील, गौडाप्पा बिराजदार, भिवा दोलतडे, दिगंबर भाकरे, महादेव लुगडे, तानाजी कांबळे, तानाजी काकडे, सुरेश कोळेकर, कार्यकारी संचालक श्री.रमेश जायभाय, ऊसे तोडणी वाहतुक यंत्रणेवर नियंत्रण ठेवणारा शेती विभागाचा स्टाफ, कारखान्याचे सर्व खातेप्रमुख, विभागप्रमुख, कर्मचारी उपस्थित होते. संचालक श्री दिगंबर भाकरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा