प्रतिमेचे पूजन आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
शिवशाही वृत्तसेवा, मंगळवेढा (प्रतिनिधी राज सारवडे)
श्री विद्या विकास मंडळ संचलित श्री संत दामाजी महाविद्यालयात पद्मभूषण मेजर ध्यानचंद यांची जयंती साजरी करण्यात आली ध्यानचंद सिंग यांचा जन्म २९ ऑगस्ट १९०५ रोजी अलाहाबाद येथे झाला ध्यानचंद सिंग हे हॉकीचे नावाजलेले खेळाडू होते म्हणून त्यांना हॉकीचे जादूगार म्हणून संबोधले जात होते.
त्यांनी भारताला १९२८, १९३२, १९३६ मध्ये ॲालम्पिक मध्ये सुवर्णपदक मिळवून दिले त्यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून संपूर्ण देशभर साजरा केला जातो. प्रथम मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन उपप्राचार्य प्रा. सदाशिव कोकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पर्यवेक्षक प्रा राजेंद्र गायकवाड,क्रिडा शिक्षक प्रा.गणेश जोरवर, प्रा.डॉ.औदुंबर जाधव, प्रा.राजकुमार मुळीक, प्रा.डॉ.राजेश गावकरे, प्रा.श्रीराम पवार, प्रा.दादासाहेब देवकर, प्रा.विलास गुरव, प्रा.विनायक कलुबर्मे, प्रा.राजकुमार पवार, प्रा.जावेद तांबोळी, प्रा.आप्पासाहेब ढाणे, प्रा.संगाप्पा पाटील, प्रा.प्रशांत धनवे, प्रा.डॉ.संजय क्षीरसागर, अतुल इंगळे, मिस्री पवा, यांचेसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा