उद्धव ठाकरे यांच्या निर्धार सभेला उसळला जनसागर
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
हिंगोली येथे रविवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जाहिर निर्धार सभेचे आयोजन रामलिला मैदानावर करण्यात आले होते यावेळी रामलीला मैदानावर निर्धार सभेसाठी लाखोंच्या संख्येने निष्ठावंत शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी बोलतांना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले की मी हिंगोलीत एका सापाला दुध पाजले साप पलटून डसला असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी घेतला गद्दाराचा समाचार.
लाखोंच्या संख्येने शिवसैनिक रामलीला मैदानावर
रामलिला मैदानावर आयोजीत एतीहासीक सभेत व्यासपिठावर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत, माजी खासदार चंद्रकांत खैरे, माजी खासदार सुभाष वानखेडे, माजी आमदार डॉ.संतोष या टारफे, माजी नागेश पाटील अष्टीकर, माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा, जिल्हा प्रमुख विनायकराव भिसे पाटील, संदेश देशमुख, शेतकरी नेते अजित मगर, जिल्हा संघटक बाळासाहेब मगर, उपजिल्हाप्रमुख परमेश्वर मांडगे यांच्या सह शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पुढे बोलतांना उद्धव ठाकरे यांनी मागील आठवड्यात नागपंचमी सण साजरा झाला असुन नागाला दुध पाजल्यावर तो वफादार असतो परंतु हिंगोलीतील गद्दार नागाला दुध पाजुन सुद्धा शिवसेनेशी गद्दारी केल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी हिंगोलीतील सभेत बोलतांना केला आहे.
पुढे बोलतांना ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर टिका करीत आमचा बाप चोरल्याचा आरोप केला आहे. उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यातील पहिली सभा हिंगोली या सभेत बोलताना त्यांनी राज्य सरकारवर टीका करत राज्यातील शेतकरी संकटात असताना उपमुख्यमंत्री जपानचे दौरे करीत आहेत तेथील पुरस्कार स्विकारत आहेत. हे कितपत योग्य आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गंभीर अहवाल सादर करणाऱ्या अधिकाऱ्यांना श्वेच्छा निवृत्ती घ्यावी लागते यापेक्षा दुर्दैव काय आहे. असा मुद्दा त्यांनी आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्या स्वेच्छानिवृत्ती वर उपस्थित केला. यावेळी त्यांनी सर्वच विरोधकांवर टिका केली.
यावेळी मंचावर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत, विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, परभणी चे खासदार बंडू जाधव, आमदार राहुल पाटील, माजी खासदार सुभाष वानखेडे, माजी आमदार डॉ संतोष टारफे, शेतकरी नेते अजित मगर, शिवसेना संपर्कप्रमुख बबनराव थोरात, सह संपर्क प्रमुख गोपू पाटील, जिल्हा प्रमुख विनायकराव भिसे पाटील, संदेश देशमुख यांच्या सह शिवसेना हिंगोली, नांदेड, परभणी जिल्ह्यातील पदाधिकारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. तसेच उद्धव ठाकरे यांचे भाषण ऐकण्यासाठी लाखोंच्या संख्येने निष्ठावंत शिवसैनिक उपस्थित होते.
आमचे हिंदुत्व हे हृदयात राम आणि प्रत्येकाच्या हाताला काम देणारे आहे भाजपाचे हिंदुत्व हे आयाराम गयाराम असे आहे अशी सडकून टीका करत भाजपाने आम्हाला हिंदुत्व शिकवू नये, असे शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिंगोली येथील जाहीर सभेत भाजपला ठणकावले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा