जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड
नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा 2023-24 मध्ये यमुनाबाई प्राथमिक विद्यालयाची विद्यार्थिनी कु.रागिनी बाबुराव शिंगणे या विद्यार्थिनीने तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत१४ वर्षा खालील क्रीडा स्पर्धे मध्ये सर्वप्रथम असून तीची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. कु. रागिनी बाबुराव शिंगणे या विद्यार्थिनीचे श्री दत्त शिक्षण प्रसारक मंडळ होटाळा या संस्थेचे अध्यक्ष श्री शिवराज पाटील होटाळकर तसेच प्रशासक प्रमुख फाजगे के.व्ही. सर
तसेच यमुनाबाई भाऊराव पाटील प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका एस.बी.पांडे शिराढोनकर तसेच पवार ए. एस. यांनी कुमारी रागिनी बाबुराव शिंगणे या विद्यार्थिनीचे कौतुक करून पुढील जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. क्रीडा प्रमुख नांदुरकर एस आर व सर्व शिक्षकसौ एस बी शिंदे सौ एस एन हंबर्डे सौ आर जी पैनापल्ले, आर पी गुंगे,जी बी कोंडामंगल मारोती नंदे , कु. शामलासामना भालेराव सौ आशाताई भालेराव यांनी अभिनंदन केले आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा