समाज बांधवांचा सत्कार समारंभ
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील विझोरा येथे छप्पर बंद शाहा फकीरसमाज बांधवांचा मेळावा आणि सत्कार समारंभ उत्साहात करण्यात आला.
या प्रसंगी नाशिक जिल्हा व मनमाड येथून आलेले महाराष्ट्र राज्याचे युवा प्रदेशअध्यक्ष अकबर शाहा, प्रदेशउपाध्यक्ष हाजी शौकत शाहा, सिल्लोड तालुक्याचे उपाध्यक्ष नईम शाहा, पत्रकार शेख संमद, शेखअहमद, आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. छप्पर बंद शाहा फकीर समाज बांधव यानी आपल्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवू नये व त्यांना उच्च दर्जाचे शिक्षण देऊन अधिकारी बनवावे तसेच समाजाला अनेक प्रकारच्या योजना शासनाकडून येतात त्या पण या समाज बांधवाना माहीत नाही कारण फकीर समाज शिक्षणापासून वंचित आहे.
त्यामुळे सर्व समाज बांधवानी आपल्या मुला मुलींना चांगले शिक्षण देवून अधिकारी कर्मचारी आमदार खासदार मंत्री बनवण्यासाठी प्रयत्न करावे. तरच समाजात आपण सन्मानाने राहू शकू, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले. त्याचप्रमाणे घरकुल बांधकाम मजूर अशा व इतर शासकीय योजनांचा देखील समाजाने लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे चिखली येथील वैद्य महेबूब हकीम पठाण, जाफर शहा कासम शहा, पत्रकार हरिभाऊ बोऱ्हाडे, आणि शिवशाही न्यूज प्रतिनिधी मुस्तफा खान पठाण हे उपस्थित होते. तसेच इतर तालुका व जिल्ह्यातील ग्रामीण भागातून आलेले छप्पर बंद फकीरशाह समाजाचे बांधव रशीद शहा शेलुदकर, सलीम शहा शेलुदकर, डॉ आमिर शहा, जावेद शहा, शफीशहा वाढोणा, रशीद शहा औरंगाबादकर, रहीस शहा पानवडोद, सलीम शहा सारोळापीर, अस्लम शहा भोकरदन, आजम शहा, खाजू शहा, अहमद शहा यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिष्ठित छोटा पुढारी बिलाल शहा, हरून शहा, हुसेन शहा, अजिस शहा . यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले
विझोरा येथील प्रतिष्ठित नागरिक तथा समाज सुधारक राजू शहा जाफर शहा यांनी या कार्यक्रमाचे आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे यासिनशहा शेलुदकर यानी सुत्रसंचालन केले, तर आभार प्रदर्शन शेख संमद शेख अहमद यांनी केले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा