विद्यार्थ्यांना टाकाऊतून टिकाऊ चे प्रात्यक्षिक
शिवशाही वृत्तसेवा, काटोल (प्रतिनिधी अनिल दुर्गे)
नबीरा महाविद्यालय काटोल व चंचल प्रिंटर यांच्यावतीने दिग्रस बु. हे गाव दत्तक घेतले आहे. त्यांनी दिग्रस बु.|| येथील शाळांना भेट देऊन बेस्ट फ्रॉम वेस्ट पध्दतीने तयार केलेल्या वस्तू वाटप करण्यात आल्या.
विद्यार्थ्यांना वह्या व पुस्तके वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे एम.बी. विभागाचे संचालक डॉक्टर हितेश वासवानी, गावचे सरपंच दिनेश मानकर, प्राध्यापक दीपक डमाळे, उपसरपंच राहुल मानकर, चंचल प्रिंटर्सचे राजू खोरगडे, वाणिज्य विभागाचे प्राध्यापक डॉक्टर रेखाचंद्र गोगले, डॉक्टर वैशाली रुईकर, डॉक्टर पुनीत राऊत, डॉक्टर मुकेश जाधव, श्री जयंत कळंबे, तसेच दोन्ही जिल्हा परिषद शाळेचे भिंगारे सर पाचमासे मॅडम, दीक्षित मॅडम, वसंतराव देशमुख विद्यालयाचे बाविस्कर सर, मोडे सर, चौधरी सर, आदी मंडळी कार्यक्रमाला उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा