सर्दी खोकला ताप याबरोबरच डोळे येण्याचे प्रमाण वाढले
शिवशाही वृत्तसेवा, धर्माबाद (तालुका प्रतिनिधी नारायण सोनटक्के)
धर्माबाद तालुक्यात मागील आठवड्यात सततच्या पावसामुळे विविध साथीचे रोग पसरत असून, डोळे येणे, सर्दी, खोकला, व तापाने लोक आजारी पडत आहेत. ग्रामीण रुग्णालय धर्माबाद येथे दररोज रुग्णांची संख्या वाढत आहे. तालुक्यात आठवडाभर सतत अतिवृष्टी झाल्याने वातावरणात बराचसा बद्दल होवून साथीचे रोग पसरण्यास सुरुवात झाली आहे.
यामध्ये डोळे येणे, सर्दी, खोकला ,ताप येणे इत्यादी रोगाने थैमान घातले आहे. त्यामुळे ग्रामीण रुग्णालय व खाजगी रुग्णालयात उपचारासाठी रूग्णांच्या रांगा दिसून येत आहेत.
या पार्श्वभूमीवर, ग्रामीण भागात आरोग्य विभागाकडून औषध वाटप करण्याची गरज आहे, अशी नागरिकांतून मागणी होत आहे.
जुन महिना पावसा अभावी कोरडा गेला होता मात्र जुलै महिन्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. वातावरणात सकाळी गारवा तर दुपारी घामाच्या धारा वाहत आहेत. त्यामुळे परिसरात रोगराई पसरत आहे.
धर्माबादचे वैद्यकीय अधिकारी डॉ सचिन बरगे यांनी साथीच्या रोगापासून सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. घराबाहेर जाताना मास्क , चस्मा वापरावे, आजारी व्यक्तीपासून अंतर राखावे, आणि वेळोवेळी हात पाय धुऊन स्वच्छता राखण्याचे नागरिकांना आवाहन केले आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा