शिंदे कुटुंबीयांच्या सामाजिक आणि राजकीय कार्याची दखल
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
वाई तालुक्यातील युवा नेतृत्व म्हणून ओळख निर्माण केलेले विकास आण्णा शिंदे यांची शिवसेनेच्या सातारा उपजिल्हाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती शिवसेना पक्ष सचिव संजय मोरे, मुख्य पक्षप्रमुख नामदार श्री एकनाथ शिंदे साहेब तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई, संपर्कप्रमुख शरद कणसे, तसेच उपसंपर्कप्रमुख एकनाथ (दादा) ओंबळे ,निलेश मोरे यांच्या आदेशानुसार हे नियुक्तीपत्र देण्यात आले.
या प्रसंगी सातारा शिवसेना संपर्कप्रमुख शरद कणसे सह संपर्कप्रमुख एकनाथ ( दादा ) ओंबळे सातारा शहरप्रमुख निलेश मोरे, सपकाळ दादा, सोपान चिकने, बबलू मुलानी,आनंद कोंढाळकर यांचीही उपस्थिती होती.
विकास शिंदे यांचे पिताश्री लोकनेते बापूसाहेब शिंदे यांनी वाई तालुक्याच्या पश्चिम भागात मागील ४५-५० वर्षे अविरत सेवा केली आहे. बापूसाहेब शिंदे यांनी अनेक कार्यकर्त्यांना मोठ्या राजकीय पदांवर नेण्याचे काम केले असून, त्यांच्या कार्यकाळात अनेक गावांमध्ये समाजमंदिर, मंदिरे, इतर विकासकामे स्वखर्चाने पूर्ण झाली आहेत व काही शासकीय निधीतून पुर्ण केली आहेत
त्यांची मातोश्री राधाताई शिंदे या पंचायत समितीच्या माजी सभापती आणि जिल्हा परिषद सदस्य म्हणून अनेक वेळा कार्यरत राहिल्या आहेत. त्यांच्या काळात पसरणी गटात व गणात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली.
शिवसेनेत शिंदे कुटुंबियांनी एक हजार कार्यकर्त्यांसह मुंबई येथे नामदार एकनाथ भाई शिंदे मुख्यमंत्री असताना वर्षा या निवासस्थानी पक्ष प्रवेश केला होता त्या अगोदर त्यांनी काँग्रेस व भाजपा पक्षाचे काम केले होते विकास शिंदे यांना सुरुवातीला वाई विधानसभा प्रमुख पद देण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या कार्यक्षमता, जनसंपर्क व संघटन कौशल्य पाहून त्यांची उपजिल्हाप्रमुख पदी निवड करण्यात आली .
विकास शिंदे यांनी वाई तालुक्यात मोठ्या प्रमाणावर शिवसेना सदस्य नोंदणी, शिवसेना शाखा उभारणी आणि कार्यकर्त्यांचे बळकटीकरण केले आहे पालकमंत्री शंभूराजे देसाई व. शिवसेने पक्षाकडून सुमारे तीन ते चार कोटी रुपयांचा निधी त्यांनी वाई तालुका ग्रामिण व नगरपालिकेसाठी आणला असून, विविध विकासकामांमध्ये त्याचा उपयोग झाला आहे. व अनेक कामे पूर्वतःस गेली आहेत
शिंदे यांनी सातारा उपजिल्हाप्रमुख पदाची धुरा हाती घेतल्यानंतर पहिल्यांदाच धाराशिवचे पालकमंत्री व परिवहनमंत्री नामदार प्रताप सरनाईक यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. व पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे ते निकटवर्तीय मानले जातात त्यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प याप्रसंगी बोलून दाखवला.व शिंदे यांच्या नियुक्तीमुळे वाई तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे
विकास आण्णा शिंदे यांना पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
*चौकट.....*
शिवसेना मुख्य पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व ससंद रत्न श्रीकांत शिंदे व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री व पर्यटन मंत्री गौण खनिज नामदार शंभुराजे देसाई व यांच्या आदेशाने सर्व कार्यकर्ते यांना बरोबर घेऊन स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिका निवडणुकीत मोठ्या ताकदीने उतरणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले





