महामार्गाच्या दुतर्फा करण्यात आले वड, पिंपळ, चिंच, जांभळं, उंबर, अशा भारतीय झाडांची लागवड
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर, (शहर प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग राष्ट्रीय महामार्ग आता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ जवळपास पूर्ण होत आला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे महत्वकांक्षी प्रकल्प असलेले श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग व श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग हे दोन्ही महामार्ग आदर्श महामार्ग करण्याचा प्रयत्न आहे. या महामार्गाच्या शुशोभिकरणासाठी वृक्षारोपण सुरू करण्यात आले आहे. वड, पिंपळ, चिंच अशी भारतीय आणि दिर्घायुषी झाडे रस्त्याच्या दुतर्फा लावण्यात येत आहेत.
"आओ मिलकर वृक्ष लगाए पर्यावरण पवित्र बनाए"
या टॅग लाईन खाली राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या पंढरपूर झोन च्या वतीने हा वृक्षारोपण कार्यक्रम जे एम म्हात्रे कंपनीने वाखरी आणि नारायण चिंचोली या ठिकाणी आयोजित केला होता. माजी विधान परिषद आमदार प्रशांत परिचारक, पालखी मार्ग प्रकल्प अधिकारी केशव घोडके, नारायण चिंचोली व वाखरीचे सरपंच उपसरपंच पत्रकार भारत नागणे, शिवशाही न्यूज चे संपादक सचिन कुलकर्णी व इतर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले .
याप्रसंगी माजी विधान परिषद सदस्य प्रशांत परिचारक, माजी जिल्हा परिषद सदस्य नानासो गोसावी, वाखरीच्या सरपंच धनश्री साळुंखे, माजी सरपंच कविता पोरे, डेप्युटी सरपंच बाळासाहेब लिंगरे, माझी डेप्युटी सरपंच संग्राम गायकवाड, शिरढोणचे माजी सरपंच दत्ता कांबळे, पंतकृपा पतसंस्थेचे चेअरमन गुलाब पोरे, वखरेचे ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत चव्हाण, विक्रम घोडके तसेच राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प अधिकारी केशव घोडके, कन्सल्टंट अखिलेश कुमार पांडे, जनरल मॅनेजर विजयकुमार, प्रोजेक्ट व्यवस्थापक बी व्ही किशोर, इंजिनीयर आकाश रणदिवे, आदींसह वखरी परिसरातील शेतकरी बांधव उपस्थित होते.
मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे, जे एम म्हात्रे कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर निसार शिराज यांनी आभार प्रदर्शन केले
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा