तालुका कृषि अधिकारी व आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक यांच्या मार्गदर्शनात प्रात्यक्षिक
नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटुंरकर)
अहमदपूर - तालुक्यात खरीप हंगामात यंदा शंखी गोगलगायचा प्रादुर्भाव पाहता तालुका कृषि अधिकारी श्री सचिन बावगे यांच्या मार्गदर्शनाखाली व आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री वासुदेव कुलकर्णी यांच्या योग्य नियोजनातून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कॅल्शियम कार्बोनेट (चूना भुकटी पावडर) शेतकरी यांना देण्यात येत आहे व ही चूना भुकटी पावडर शेताच्या चारही बाजूंनी बांधाच्या आत साडेतीन सेंटीमीटर चा चुन्याचा पट्टा ओढून प्रत्यक्ष प्रात्यक्षिकं करून दाखवण्यात येत आहे.
या बांधाच्या ओढलेल्या चुन्याच्या पट्यामुळे बाहेरील प्रक्षेत्रावरील शंखी गोगलगाय प्रात्यक्षिक क्षेत्र मध्ये येणार नाही आणि आली तर या चुन्याच्या पट्या सोबत तिचा संपर्क होऊन तीचा नाश होणार आहे.दुसरे नियंत्रण करताना शेतकरी यांनी शेतातील शंखी गोगलगाय एकत्र वेचून त्या साबणाच्या किंवा मिठाच्या पाण्यात मिसळून त्या नष्ट करण्याचे आव्हान ही आत्मा कृषि विभाग च्या माध्यमातुन ठिकठिकाणी ग्रामपंचायत गावात आत्मा च्या माध्यमातुन करण्यात येत असल्याचे वासुदेव कुलकर्णी यांनी सांगीतले.
तसेच शेतकरी बांधवामध्ये शंखी गोगलगाय चे नियंत्रण होण्याच्या उद्देशाने गावोगावी रथ फिरत असल्याचे ही सांगण्यात आले व आत्मा योजने च्या माध्यमातुन जास्तीत जास्त शेतकरी यांनी या प्रात्यक्षिकं योजनेचा लाभ घेण्याचे आव्हान आत्माचे वासुदेव कुलकर्णी तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा यांनी केले प्रक्षेत्र मौजे हिंगणगाव येथे सदरील शंखी गोगलगाय चे प्रात्यक्षिकं करून दाखवण्यात आले यावेळी गावांतील प्रगतशील शेतकरी श्री सूर्यकांतराव फड,महादेव फड, पिंटू फड उपस्थित होते .
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा