कुलस्वामिनी तुळजाभवानी, अक्कलकोट स्वामी समर्थ व श्री विठ्ठल रुक्मिणीचे घेतली आशीर्वाद
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (शहर प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुविद्य पत्नी सौ. लताताई शिंदे यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज, व पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी यांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांचा संपूर्ण परिवार हे आध्यात्मिक भागवत संप्रदायाला मानणारे आहेत व श्री विठ्ठल रुक्मिणी वर त्यांची नितांत श्रद्धा आहे.
नुकत्याच झालेल्या आषाढी एकादशी पंढरपूर वारीनिमित्त आपण मुख्यमंत्र्यांचा पंढरपूर विषय असलेला भक्तिभाव अनुभवला आहे.
त्यामुळेच मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सौ. लताताई वाढदिवसाच्या निमित्ताने आशीर्वाद घेण्यासाठी तुळजापूर अक्कलकोट व पंढरपूर येथे आल्या होत्या.
दर्शना नंतर शिवसेना सोलापुर लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे परिवाराच्या वतीने त्यांचा तुळशीहार शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला
यावेळी त्यांच्या समवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जिल्ह्यातील विश्वासू शिलेदार असलेले शिवसेना सोलापूर लोकसभा संपर्कप्रमुख महेशनाना साठे व त्यांच्या सौभाग्यवती लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायत सदस्य सौ. रोहिणी महेश साठे, जिल्हाप्रमुख मनीष निकाळजे, साईनाथ बडवे, सुमित शिंदे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा