जि.प.चे दोन्हीही शिक्षणाधिकारी निलंबित
शिवशाही वृत्तसेवा, जिल्हा प्रतिनिधी,परभणी बाळासाहेब घिके
खोटा दस्तऐवजाच्या आधारे मुख्याध्यापक, सहशिक्षक, कलाशिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांना अनियमितपणे वैयक्तिक मान्यता प्रदान करीत शासनावर आर्थिक दायित्व निर्माण केल्याबद्दल जिल्हा परिषदेअंतर्गत शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे व शिक्षणाधिकारी श्रीमती आशा गरुड या दोघांना राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने निलंबित केले आहे.
परभणी जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून भुसारे व माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून श्रीमती गरुड हे दोघे कार्यरत असतांना खोट्या दस्तऐवजाच्या आधारे जिल्ह्यातील अनेक खाजगी शिक्षण संस्थांमध्ये कार्यरत असणाऱ्या मुख्याध्यापक, सहशिक्षक, कलाशिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना अनियमितपणे वैयक्तिक मान्यता प्रदान करून या दोघांनी शासनावर आर्थिक दायित्व निर्माण केल्याचे शालेय शिक्षण विभागाने या आदेशातून म्हटले आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा