विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे तसेच खाऊचे वाटप
शिवशाही वृत्तसेवा, पारनेर (प्रतिनिधी सुदाम दरेकर)
उद्योजक राजेंद्र शेलार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून एक सामाजिक बांधिलकी जपत तसेच गावातील जिल्हा परिषद शाळेचा विकास व्हावा या प्रमुख उद्देशाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मठ वस्ती पळवे खुर्द, येथे शालेय साहित्यांचे तसेच खाऊचे वाटप करण्यात आले.
त्यावेळी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मठ वस्ती मुख्याध्यापक खामकर सर व शाळा व्यवस्थापन समिती( मठ वस्ती) अध्यक्ष -सुरेश शेळके, प्रसाद तरटे (ग्रा .सदस्य),अमोल शेळके, तात्या भाऊ शेळके सर, राजेंद्र शेळके ,अमोल तरटे ,नितीन गुंड, अशोक गवळी, विजय गाडीलकर व महिला पालक वर्ग उपस्थित होते तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मठ वस्ती परिवारातर्फे व शाळा व्यवस्थापन समिती (मठ वस्ती) तर्फे राजेंद्र शेलार यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देण्यात आल्या.. या अभिनव उपक्रमामुळे सर्व विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा