महाआरती व तीर्थप्रसादाचे आयोजन
शिवशाही वृत्तसेवा, अकोला (जिल्हा प्रतिनिधी संजय क्षीरसागर)
दिनांक १६ जुलै रोजी वारकरी संप्रदाय मधील श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवन समाधी दिनानिमित्त नंदिपेठ मधील नंदिकेश्वर संस्थान मध्ये सायंकाळी हरिपाठ व ह.भ.प वैष्णव महाराज ऋत्विज यांच्या सुमधुर वाणीने भजन व महाआरतीचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात श्री संत सावता महाराज यांच्या वेशभूषेत साहेबरावजी उपासे यांनी भूमिका सादर केली. धीरज आढाऊ, दुर्गेश बाळे , नितीन रोडे, अश्विन बोराडे ,किशोर बहादुरे,जयेश भुस्कट यांनी साथसंगत केली. त्याचबरोबर तीर्थ प्रसादाचा कार्यक्रम करण्यात आला.
कार्यक्रमास नंदूभाऊ शेगोकार, संजय पिंपळे, मंगेश चिखले, धोंडोपंत उपाशे, ह भ प साहेबरावजी पिंपळे, अरविंद दिंडोकार यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रमुख नियोजन अनंता गनंगणे, दिनूभाऊ चिखले, सचिन भुस्कट ,रविभाऊ केवटी, मयुर निमकर, सचिन काळे, शुभम बोरोडे, प्रणव शेगोकार, संतोष निमकर यांनी उत्तम साऊंड सिस्टीम आणि मुकेश जावरकर यांनी मंडप लाइटिंगची व्यवस्था केली होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नंदिकेश्वर सांप्रदायिक भंजन मंडळ ,नंदिकेश्वर महिला मंडळ , कानोबा महिला मंडळ, कृष्णाली महिला मंडळ यांनी परिश्रम घेतले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा