maharashtra day, workers day, shivshahi news,

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या प्रचार रथाचा शुभारंभ

प्रधानमंत्री पीक विमा योजनेविषयी देणार शेतकऱ्यांना माहिती 
Collector Dr. Rajesh Deshmukh launches campaign of Pradhan Mantri Crop Insurance Yojana, pikvima, pue, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा पुणे,(जिल्हा प्रतिनीधी अभिषेक जाधव)
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या प्रचार रथाचा शुभारंभ तसेच योजनेविषयी माहिती देणाऱ्या घडीपत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी संजय काचोळे, कृषि उपसंचालक संजय विश्वासराव, उप विभागीय कृषि अधिकारी सूरज मडके, तंत्र अधिकारी रुपाली बंडगर आदी उपस्थित होते.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेविषयी माहिती देणाऱ्या दोन प्रचाररथाच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व तालुक्यात पीक विमा योजनेविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. पहिल्या चित्ररथाचा मार्ग हवेली १७ व १८ जुलै, खेड १९ व २० जुलै, जुन्नर २१, २२ व २३ जुलै, आंबेगाव २४ व २५ जुलै, मावळ २६ व २७ जुलै, मुळशी २८, २९ व ३० जुलै तसेच दुसऱ्या चित्ररथाचा मार्ग शिरूर १७ व १८ जुलै, दौंड १९ व २० जुलै, बारामती २१ व २२ जुलै, इंदापूर २३ व २४ जुलै, पुरंदर २५ व २६ जुलै, भोर २७ व २८, वेल्हा २९ व ३० जुलै असा असणार आहे.
जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी यावेळी केले.

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !