maharashtra day, workers day, shivshahi news,

महामार्गावरील पेट्रोल पंप दरोडा गुन्हा चार तासात उघड. पाच आरोपीसह लाखो रुपयाचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई :-

समाजात गुन्हेगारी चे प्रमाण वाढले

Crime rate increased in the society , Deulgaon Raja , Jalna , shivshahi news.



शिवशाही वृत्तसेवा, जिल्हा प्रतिनिधी जालना मुस्तफा खान पठाण

जालना ते देऊळगावराजा या महामार्गावरील मौजे जामवाडी शिवारातील इंडियन ऑईल पेट्रोल पंपावर दिनांक 14/07/2023 रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास अज्ञात पाच आरोपीतांनी पेट्रोल पंपावरील वॉचमन व कर्मचारी यांना खंजीर व एअर गण चा धाक दाखवुन त्यांना मारहाण करुन 32,000/- रुपये जबरीने चोरुन नेले प्रकरणी पोलीस ठाणे तालुका जालना येथे विनायक सखाराम काळे रा. काद्राबाद जालना यांचे तक्रारी वरुन गुन्हा रजि नं 441 / 2023 कलम 395 भादंवि प्रमाणे दाखल आहे. गुन्हा सदर चा गुन्हा घडल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक श्री. रामेश्वर खनाळ स्थागुशा जालना यांनी भेट देऊन गुन्हे शाखेचे पथके तयार करुन पथकातील अधिकारी व अमलदार यांना सदर चा गुन्हा उघडकीस आणण्याच्या सुचना व मार्गदर्शन केले होते.


त्या अनुषंगाने दिनांक. 15/07/2023 रोजी स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व अंमलदार हे तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदारा मार्फतीने दरोडा चे गुन्हे करणारे आरोपीतांची माहिती घेत असतांना सदरचा गुन्हा हा (1) गणेश प्रल्हाद विधाते, वय •21 वर्षे रा. लालबाग जालना याने त्याचे साथीदारासह केल्याची माहिती मिळाली.

मिळाले माहिती आधारे तात्काळ आरोपी गणेश विधाते यास ताब्यात घेऊन त्याचेकडे गुन्ह्या संबंधाने विचारपुस केली असता त्याने त्याचे साथीदार नामे (2) साबेर सय्यद निसार सय्यद वय 21 वर्षे, रा. चंदनझिरा जालना, (3) कैसर ऊर्फ सोनु सांडु शेख वय 26 वर्षे, रा. मियासाब दर्गा मस्तगड जालना, (4) योगेश एकनाथ खणपटे वय 28 वर्षे, रा. जमुनानगर जालना, (5) शेख आजम शेख मुख्तार वय 22 वर्षे, रा. जमुना नगर जालना यांचे सोबत मिळुन काल संध्याकाळी एकत्रित येवुन पेट्रोलपंप लुटण्याचे ठरविले. त्यानंतर सर्व आरोपी हे जालना-देऊळगाव राजा रोड जवळ दरोडा टाकण्यासाठी उपयोगी असलेले दोन चाकु, एक एअर गन असे सोबत घेऊन त्यांचा दोन मोटार सायकलवर पेट्रोलपंपातील कॅबीनमध्ये जावुन तेथील पेट्रोलपंपावर काम करणान्या दोन इसमांना चाकुचा धाक दाखवून मारहाण करून त्यांचे गल्ल्यातील व खिश्यातील पैशे चोरी केल्याचे सागितले.


त्यानंतर गुन्हयातील ईतर साथिदारांना वेगवेगळया ठिकाणावरून शिताफीने ताब्यात घेऊन त्यांच्याकडुन गुन्हयात वापरलेले दोन चाकु, एक एअर गन, दोन मोटार सायकली मोबाईल फोन व गुन्हयात लुटलेली रोख रक्कम असा एकुण 1,36,500 /- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.तसेच यातील आरोपी नामे गणेश प्रल्हाद विधाते, वय 21 वर्षे, रा. लालबाग जालना, 2) कैसर ऊर्फ सोनु सांडु शेख वय 26 वर्षे, रा. मियासाब दर्गा मस्तगड जालना व ईतर एक आरोपी असे तिघांनी मिळुन पोलीस स्टेशन कदिम जालना येथील गुन्हा रजि नं 295 / 2023 कलम 392,34 भादंवि हा गुन्हा केल्याचे मान्य केले असल्याने तो गुन्हा देखील उघडकीस आला आहे.

पाचही आरोपींना पुढील तपासकामी पोलीस स्टेशन तालुका जालना येथे हजर करण्यात आले आहे. सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोशी व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. डॉ. राहुल खाडे, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रामेश्वर खनाळ, सपोनि श्री आशिष खांडेकर, पोउपनि श्री प्रमोद बोंडले, सॅम्युअल कांबळे, गोकुळसिंग कायटे, विनोद गडदे, कृष्णा तंगे, सागर बाविस्कर, दत्तात्रय वाघुंडे, सचिन चौधरी, प्रशांत लोखंडे, योगेश सहाने, धिरज भोसले सर्व स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी केली आहे.

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !