गुरूचे सानिध्य आणि मार्गदर्शन ज्यांना लाभते त्यांच्या आयुष्याचे सोने होते
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
समाजात गुरूचे स्थान सर्व श्रेष्ठ आहे. गुरूबद्दल प्रेम व्यक्त करण्यासाठी आपण गुरूपोर्णिमा साजरी करतो. श्री श्री प. पु सद्गुरु नराशाम महाराज संस्थान महाराष्ट्र ,आंध्रप्रदेश,कर्नाटक , तेलंगाना राज्यामध्ये शिष्यगण मोठ्याप्रमाणात व्यापलेला आहेत.
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सर्व शिष्य एकत्र आले होते. सर्व शिष्यांच्या व भक्तगणाच्या उपस्थितीत संजीवन समाधीला महाभिषेक, महाआरती शिष्याकडून करण्यात आले .
भाविकांसाठी महाप्रसादाची सोय श्री भास्कर पाटील शिरूरकर व श्री पांडुरंग गोविंद यन्नावार देगलूरकर यांनी केली. गुरूचे सानिध्य आणि मार्गदर्शन ज्यांना लाभते त्यांच्याआयुष्याचे सोने होते.
यावेळी सद्गुरूंचे आशीर्वाद व दर्शन घेण्यासाठी.आलेल्या शिष्यांनी मठाधिपती श्री श्री परमपूज्य सद्गुरु नराशाम महाराज सद्गुरु यांची पाद्य पूजा करून आशीर्वाद घेतले.
यावेळेस .मा.जि.प. अध्यक्ष नांदेड श्री दिलीप पाटील बेटमोगरेकर ,मा.जि.प. सदस्य नांदेड
सौ पुनमताई राजेश पवार नांदेड दर्शनासाठी आलेले होते.झालेल्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री बाळू महाराज जोशी येवतीकर व समस्त भक्तगणांनी विशेष प्रयत्न केले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा