गुरु पोर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड, जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
श्री श्री श्री १०८ श्री स्वा लोमी डॉ. प्रसादबन गुरु रामेश्वरबन जी महंत महाराज श्री दत्त संस्थान कोलंबी . यांची ४६ ( सेहचाळीसवी ) पुण्यतिथी निमित्त दि ३ जुलै २०२३ . आषाढ गुरु पोर्णिमा रोज सोमवार सकाळी ठिक १० : ०० ( दहा वाजता ) समाधी अभिषेक पूजन व भजन,त्या नंतर महाप्रसाद आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व भावीक भक्त शिष्य मंडळी ह्यानी कार्यक्रमास आवश्य येऊन या सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे कोलंबी संस्थानचे विषवस्थ मंडळ अध्यक्ष व सर्व विश्वस्त व संस्थान चे महंत श्री.108 यदुबन गुरू गँभिरबन महाराज दत्त संस्थान कोलंबी यांनी आव्हान केले आहे .
गेल्या अनेक दिवसांपासून गुरुपौर्णिमा कार्यक्रम कोलंबी येथे मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो या कार्यक्रमात महाराष्ट्र,कर्नाटक,तेलंगणा राज्यातील भक्त गण दरवर्षी येऊन दर्शन, भजन,कीर्तन कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होतात .या वर्षी अद्याप पावसाळा म्हणावा तसा सुरू झाला नसल्याने भक्त गण येथील मूर्ती व समाधी याचे दर्शन घेऊन पावसासाठी च्यातका सारखी वाट पहात असलेला शेतकरी वर्ग गुरुकडे इशवरा कडे साकडे घालून प्रार्थना करतील
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा