देशाची संस्कृती जोपासण्याचे काम भारताचे प्रभावशाली पंतप्रधान मा नरेंद्र मोदी
शिवशाही वृत्तसेवा,नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कूंटुंरकर
खा.चिखलीकर धार्मिक स्थळाचा विकास घडवून देशाची संस्कृती जोपासण्याचे काम भारताचे प्रभावशाली पंतप्रधान मा नरेंद्र मोदी हे करीत असून काशीचा कायापालट, तुमच्या आमच्या मनातील राममंदिराचे स्वप्न साकारण्याचे काम ते करीत आहेत याच धर्तीवर कोलंबी तीर्थ क्षेत्रात काय पालट करण्या साठी ऐंशी लाखाच्या निधीतून सीसी रस्ता पन्नास लाख व फेलवर ब्लॉक चे तीस लाख आ.राम पाटील रातोळीकर यांच्या निधीतून काम दिले असून अजून पनास लाख खासदार निधीतून देऊ असे जाहीर आश्वासन देत गुरू पौर्णिमेच्या निमित्ताने व गुरूच्या दर्शना साठी येणाऱ्या भाविकांची सोय व्हावी या साठी त्यांच्या हक्काची निधी देता आला हे माझे भाग्य आहे असे भावुक उदगार नांदेड चे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी काढले. व पुढील विकासासाठी 50 लाख निधी देणार असे उदगार खा चिखलीकर यांनी काढले.
ते कोलंबी येथे खा चिखलीकर यांच्या वतीने 50 लाख खर्चून उभारण्यात येणाऱ्या दत्त मंदिर ते बसस्टँड सीसी रस्ता,व आ रातोळीकर यांच्या निधीतून 30 लाख खर्चून दत्त मंदिर परिसरात उभारण्यात येणाऱ्या फ्लेवर ब्लॉक कामाच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री 108 महंत यदुबन गुरू गंभिर बन दत्त संस्थान कोलंबी हे होते.तर प्रमुख अतिथी म्हणून आ.राम पाटील रातोळीकर ,मंदिराचे विषवस्थ माजी आ.वसंत चव्हाण ,शिवराज पाटील होटाळकर,डाँ सचिन उमरेकर, केशव पाटील चव्हाण,विनायक शिंदे,श्रीनिवास चव्हाण,देवसरकर,अशोक पा मुगावकर,निळकंठ मांजरमकर,डी एन शिंदे,राज बियाणी,पो.नि.गुट्टे,उपविभागीय अभियंता बारस्कर सह
आदींची उपस्थिती होती.
प्रारंभीश्री श्री श्री १०८ श्री स्वामी डॉ. प्रसादबन गुरु रामेश्वरबन जी महंत महाराज श्री दत्त संस्थान कोलंबी . यांची ४६ पुण्यतिथी निमित्त दि ३ जुलै २०२३रोज सोमवारी .आषाढ गुरु पोर्णिमा चे औचित साधून सकाळी समाधी चा अभिषेक व आरती मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. कोलंबी संस्थानचे विषवस्थ मंडळ , संस्थान चे महंत श्री.108 यदुबन गुरू गँभिरबन महाराज दत्त संस्थान कोलंबी व ग्रामस्थ यांच्या वतीने मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला .
या वेळी मंदिर संस्थान च्या वतीने अविनाश बन महाराज यांनी प्रास्ताविक केले.तर विषवस्थ तथा माजी आ.वसंत चव्हाण आ.राम पाटील रातोळीकर, यांची समयोचित भाषणे झाली.अध्यक्षीय समारोप महंत यदुबन महाराज यांनी केला.कार्यक्रमाचे सूत्र संचलन प्रवीण बैस यांनी केले तर आभार सरपंच प्रतिनिधी प्रल्हाद बैस यांनी मानले.या वेळी कोलंबी येथील ग्रा.प.उपसरपंच डाँ गवाले, ग्रामसेवक टी जी रातोळीकर व सर्वसदस्य,चेअरमन वेंकट शिंदे,तंटा मुक्ती अध्यक्ष भिवा पाटील शिंदे,सचिन बेंद्रीकर,प्रभाकर मोरे,विशाल शिंदे,ऋषी मोरे,यांच्या सह कोलंबी सह जिल्ह्यातून, बाहेर जिल्ह्यातून आलेले भक्तगण मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.सकाळ पासून सायंकाळ पर्यंत दर्शना साठी येणाऱ्या हजारो भाविक भक्त यांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा