पवार व सुळे यांचे वृक्षारोपणाद्वारे अभिष्टचिंतन
शिवशाही वृत्तसेवा, जिल्हा प्रतिनिधी, बाळासाहेब घिके परभणी
शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष तथा प्रथम महापौर प्रताप देशमुख यांच्या संकल्पनेतून तसेच युवा नेते नासेर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्षा खासदार सौ. सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त 365 झाडांची लागवड करीत त्यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले.
शहरातील मध्यवस्तीतील खंडोबा बाजार परिसरातील मराठवाडा हायस्कुल शाळेच्या प्रांगणात शनिवारी सकाळी राष्ट्रवादीच्या मान्यवरांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा वृक्ष लागवडीचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी कडूलिंबाची 365 झाडे लावण्यात आली. पवार यांच्या अभिष्टचिंतनानिमित्त दरवर्षी राष्ट्रवादीद्वारे वृक्षारोपण करण्यात येत आले आहे, असे महानगर जिल्हाध्यक्ष देशमुख यांनी यावेळी नमूद केले. मागिल वर्षात शहरातील विविध भागात 22 हजार 630 झाडे लावण्यात आली. ती झाडे नागरीकांच्या सहकार्याने जोपासण्यात आली, असे ते म्हणाले. तर आजपासून सुरु असणार्या या उपक्रमातून अन्य शाळांच्या प्रांगणातही 22 जुलै पर्यंत वृक्षारोपणाचे अभियान राबविण्यात येणार आहे, असे राष्ट्रवादीचे उपशहर जिल्हाध्यक्ष नासेर शेख यांनी म्हटले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा