नवनिर्वाचित सरपंच व पुरस्कार प्राप्त महिलांचा शेळगाव छत्री जि.प.शाळेत सन्मान
शिवशाही वृत्तसेवा,नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
तालुक्यातील मौजे शेळगाव छत्री येथील जिल्हा परिषद शाळेच्या वतीने नवनिर्वाचित सरपंच चांगूबाई अशोक बैलकवाड आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने लोकमाता अहिल्यादेवी होळकर महिला पुरस्कार प्राप्त असलेल्या माजी सरपंच सुनीता संजय आनेराये, उपसरपंच आशा बालाजी सालेगाये तर सेट परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सौ.एस.जी.कुंडलवाडीकर यांचा सन्मान शालेय समितीचे अध्यक्ष सुरेश सालेगाये यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला.
प्रारंभी हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त मान्यवर व शिक्षक वृंदांनी प्रतिमेस अभिवादन केले. सरपंच महिला, पुरस्कार प्राप्त महिला व सेट परीक्षा उत्तीर्ण झालेल्या शिक्षिकेचा सन्मान झाल्यानंतर शेळगाव छत्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ एस एस बच्चेवार आणि तंटामुक्ती अध्यक्ष माधव बैलकवाड यांनी शाळा विद्यार्थी व गाव याविषयी आपले विचार मांडले. यावेळी संजय पाटील आनेराये,शालेय समितीचे उपाध्यक्ष यम ए बैलकवाड,यासह सदर शाळेचे शिक्षकवृंद व्हि. के रामलोड, यु एस बाराळे,सौ.एम.पी.जाधव मॅडम, सेविका अहिल्याबाई नागोराव बैलकवाड यासह शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यु एस बाराळे यांनी तर आभार व्हि.के रामलोड यांनी मानले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा