बीएसएफ ची प्रशिक्षण पूर्ण केल्या बद्दल आष्टी ग्रामपंचयतीतर्फे विजयालक्ष्मी चे स्वागत
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटुंरकर
आष्टी येथील विजयालक्ष्मी संजय शेटे बीएसएफ आर्मी ट्रेनिंग करून आल्याबद्दल आष्टी ग्रामपंचायत येथे ग्रामपंचायतमधील सर्व सदस्यांनी त्यांचा सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. मागील तीन वर्षापासून छत्रपती संभाजी नगर येथील गरुड झेप अकॅडमी येथे विजयालक्ष्मी ही प्रशिक्षण घेत होती. तेथील प्राचार्य सोनवणे सर यांचे यामध्ये मोलाचे मार्गदर्शन लाभले लेखी परीक्षा, शारीरिक तपासणी यासाठी तीन वर्षे प्रयत्न केले त्यानंतर नाशिक येथे चाचणी दरम्यान 2022 ऑक्टोबर या दिवशी निवड करण्यात आली.
सध्या विजयालक्ष्मी ही पश्चिम बंगाल येथे ट्रेनिंग संपून ती आपल्या गावी असता तिचा आष्टी येथील ग्रामविकास अधिकारी सरपंच वर सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीने सत्कार करण्यात आला एक मुलगी म्हणून धाडसीपणाने या सर्वांना तोंड देत देश सेवेसाठी तत्परता दाखवल्यामुळे गावांमधून तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा