फुले शाहू आंबेडकर क्रांती मंचाचा स्तुत्य उपक्रम
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटुंरकर
नरसी ते देगलूर हायवे रोडवर बिजूर व बोरगाव फाटा याच्या मध्ये एका अज्ञात व्यक्तीने वडाच्या झाडाला आग लावली होती. व ते जळून आतुल टोगर झाल्यामुळे ते वादळ वाऱ्यामध्ये एखाद्या ऑटो, एसटी वर किंवा इतर कुठल्याही वाहनावर पडून मोठा अपघात झाला असता. जीवित हानी होऊ नये म्हणून फुले शाहू आंबेडकर क्रांती मंच चे प्रमुख भास्कर भेदेकर यांनी त्या वडाच्या झाडाला लागलेली आग विझवण्यासाठी रात्री उशिरा नऊच्या दरम्यान अग्निशमन दलाच्या विभागाला फोनवर संपर्क साधून ही आग विझवली.
ही आग वीजेपर्यंत झाडाच्या आत बुडामध्ये 75 टक्के जळून संपूर्ण टोगर झाल होत. अपघात झाल्यानंतर हळहळ व्यक्त करत बसण्यापेक्षा त्या अगोदरच सतर्कता ठेवून भेदेकर यांनी पत्रकार कंधारे यांच्या सहकार्याने वन विभागाला सांगून ते झाड तोडून टाकण्यात आले होते. त्यात तोडलेल्या झाडाची कमतरता भासू नये म्हणून त्या ठिकाणी हायवे रोडवर दि.18 जुलै रोजी बोरगाव फाटा येथे सर्वात जास्त ऑक्सिजन देणारे झाड व सावली देणारे झाड म्हणून ओळखले जानारे पिंपळाचे झाड त्या ठिकाणी फुले शाहू आंबेडकर क्रांती मंच्या वतीने लावण्यात आले. यावेळी फुले शाहू आंबेडकर क्रांती मंच प्रमुख भास्कर भेदेकर, बाबू भेदेकर, रमेश शेळके, साहेबराव बक्कावाड, नितीन भेदेकर आदी जण उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा