लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
शिवशाही वृत्तसेवा, जालना (जिल्हा प्रतिनिधी मुस्तफा खान पठाण)
भोकरदन पंचायत समिती कार्यालयातील दोन कंत्राटी कर्मचारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत रंगेहाथ सापडले आहेत. सार्वजनिक पाणी पुरवठा विहीरीचे बिल काढण्यासाठी लाच मागणी करणाऱ्या व घेणाऱ्या भोकरदन पंचायत समिती कार्यालयातील दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांवर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून मोठी कारवाई केली आहे.
दरम्यान एका कर्मचाऱ्याने ७ हजार रुपयांची लाच तर दुसऱ्या कर्मचाऱ्याने ३ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे कारवाईत समोर आले आहे.
तांत्रिक सहाय्यक प्रशांत रामेश्वर दहातोंडे व संगणक परिचालक सतिश रामचंद्र बुरंगे असे कारवाई झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
हि कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अप्पर पोलीस अधीक्षक विशाल खांबे, यांच्या मार्गदर्शनाखाली जालना पोलीस उपअधीक्षक किरण बिडवे यांच्यासह ज्ञानदेव झुंबड, शिवाजी जमदाडे, गजानन घायवट, कृष्णा देठे, गणेश बुजाडे, जावेद शेख, आत्माराम डोईफोडे, गजानन कांबळे, प्रवीण खंदारे, यांनी सापळा रचुन केली आहे. या कारवाईमुळे कर्मचारी वर्गांत घबाराटीचे वातावरण आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा