अभिष्टचिंतन सोहळ्यात शुभेच्छा देण्यासाठी उसळला जनसागर
शिवशाही वृत्तसेवा नांदेड, जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
"ज्या व्यक्तीचे समाजावर प्रेम असते त्यांच्या वर समाज निसिम प्रेम करतो.त्या व्यक्तीच्या जीवनातील संकट दूर व्हावेत यासाठी साठी इशवराकडे इष्ट इच्छितात तो सोहळा म्हणजे अभिष्टचिंतन सोहळा. सज्जनाला आयुष्य कमी व दुर्जनाला अधिक ही परंपरा पूर्वापार चालत आली असून सज्जनांच्या आयुष्यातील सुखाचे क्षण वाढवण्यासाठी या सोहळ्याची कलयुगात नितांत गरज आहे." असे प्रतिपादन हरिभक्त परायण रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांनी काढले.
\
१९ जुलै रोजी भाजपा युवा नेतृत्व श्रावण पाटील भिलवंडे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्त नरसी येथे आयोजित किर्तन सोहळ्यात ते बोलत होते. या कीर्तन सोहळ्यात नांमवन्त भजनी व मृदंग वादक हजर होते. किर्तन संपल्या नंतर मित्रमंडळाच्या वतीने अभिष्ट चिंतन सोहळा झाला.
"भाजपा महाजनसंपर्क उपक्रमाअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या यशस्वी ९ वर्षपुर्ती बद्दल सेवा, सुशासन व गरीब कल्याणचा आवाज बुलंद करत घर चलो अभियान पत्रकाचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शतप्रतिशत भाजपा ही भुमिका घेत गेली अनेक वर्ष एकनिष्ठेने सबंध नायगांव विधानसभा मतदार संघात भाजपाला पोषक वातावरण तयार करण्यासाठी काम करणारे नेतृत्व व उत्तम संघटक असून सर्वसामान्य भाजपा कार्यकर्त्यांना ताकद देत खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली विविध उपक्रमाच्या माध्यमातून पक्षाला उभारी देणाचे काम करीत आहेत. अशा शब्दांत प्रणिताताई चिखलीकर यांनी श्रावण पाटील भिलवंडे याचा गौरव केला.
भाजपा जिल्हा सरचिटणीस श्रावण भिलवंडे यांना वाढदिवसाच्या निमित्ताने यापुढील सत्कार्यास शुभेच्छारुपी पाठबळ देण्यासाठी तमाम भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व चाहत्यांनी सकाळ पासूनच नरसी नगरीत मोठया संख्येने हजेरी लावलीहोती .या कार्यक्रमात खा चिखलीकर हे अधिवेशना साठी दिल्ली दौऱ्यावर असल्याने यांच्या वतीने प्रतिनिधी म्हणून भाजप महिला मोर्च्या च्या प्रदेशसदस्य प्रणिताताई चिखलीकर देवरे,प्रवीणजी साले,लक्ष्मण ठकरवाड,गंगाधर जोशी,बालाजी बचेवार,जनार्धन ठाकूर,भगवान लंगडापुरे,गोविंद कुंटुरकर,धनराज शिरोळे,विजय होपळे, कोंडीबा शिंदे,प्रा.जीवन चव्हाण,गंगाजी पाटील मुगावकर,शंकर कल्याण, सचिन बेंद्रीकर,विशाल शिंदे,हरीचंद चव्हाण,शिवाजी वडजे,या सह आदी उपस्थित होते.
सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन मारोती पा. भिलवंडे , मोहनराव पा.भिलवंडे माजी सरपंच गजानन भिलवंडे ,आनंदराव बावणे,कस्तुरे, व्यंकटराव कोकणे , बालाजीराव चिंतावार ,हणमंत मिसे , त्र्यंबक डाके ,खलील शेख, राजू वडगावे, पपु आकमवाड, राजू खनपटे,डी एम भिलवंडे,यांसह अनेक कार्यकर्ते यांनी व श्रावण पा.भिलवंडे वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा संयोजन समितीने प्रयत्नकेले. कार्यक्रमाचे सुरेख संचलन भूषण पारळकर यांनी केले.कार्यक्रम संपल्या नंतर सर्व उपस्थितांना इष्ट भोजन व अधिकमासा निमित्त धोंडे जेवण देण्यात आले
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा