50 मजुरांना मिळाला रोजगार
शिवशाही न्यूज साठी, मुस्तफा पठाण, जालना जिल्हा प्रतिनिधी
भोकरदन तालुक्यातील धावडा येथील शेतकऱ्याला तिखट हिरव्या मिरची उत्पादनातून चांगलाच गोडवा मिळाला असून 11 एकर लागवड केलेल्या विविध प्रकारच्या मिरची उत्पादनातून आतापर्यंत तब्बल 55 लाख 30 हजार रुपयांचे उत्पादन मिळाले असून असाच भाव टिकून राहिला तर हा आकडा 1 कोटीच्या घरात जाण्याची शक्यता आहे.
तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात मिरची लागवड करतात या वर्षी 5 हजार हेक्टर मध्ये मिरची लागवड करण्यात आली आहे, धावडा येथील शेतकरी एकबालखा आक्रंमखा पठाण, खालेदखा पठाण या भावंडांनी 35 एकर शेतीपैकी 11 एकर शेतीमध्ये 13 एप्रिल ते 30 एप्रिल या दरम्यान शेतात गाडी वाफे बेड तयार करून त्यावर मल्चिंग पेपर टाकून ठिबकद्वारे पाणी देऊन सिमला, पिकाडोर, बलराम,ज्वलरी,तेजा आशा विविध प्रकारच्या मिरचीची चार बाय सव्वा अशा अंतरावर ठिबक च्या नळीच्या दोन्ही बाजूने लागवड केली त्यापूर्वी रासायनिक खतांचा बेसल डोस दिला, या ऐकून लागवडी साठी पठाण कुटुंबाला 10 लाख 80 हजार खर्च आला या वर्षी उन्हाळ्यात उन्हाची तीव्रता अधिक होती त्यामुळे केलेला खर्च निघतो की नाही असे वाटत होते अनेक शेतकऱ्यांनी एकबाल पठाण यांना तुम्ही एवढी मिरची लागवड करून चूक केली असे सांगत होते मात्र पठाण यांनी न डगमगता मिरची पिकावर ओषधी, खते, फवारणी करण्यासाठी खर्च कमी पडू दिला नाही, शेवटी मिरची साठी पाणी कमी पडू लागले तेव्हा टॅंकर ने पाणी विकत घेऊन मिरची जोपासली जून मध्ये प्रत्यक्ष उत्पादनाला सुरुवात झाली .
असता त्यांना 11 हजार, 10 हजार 9 हजार असा भाव मिळाला, तर सिमला मिरचीला 4 हजार 500, व पिकडोर ला सुध्दा 4 हजाराचा भाव मिळाला त्यामुळे आत्तापर्यंत त्यांना तब्बल 55 लाख 30 हजार रुपयांचे उत्पादन मिळाले असल्याचे शेतकरी एकबाल पठाण यांनी सांगितले, ते म्हणाले की आमचा किराणा व्यवसाय असून धावडा गावात दोन दुकाने आहेत मात्र पहिल्या पासून त्यांना शेती करण्याची आवड आहे त्यामुळे आपण चांगली शेती करतो तीन वर्षां पूर्वी दूर असलेली शेती विकली व या वर्षी धावडा ते भोरखेडा रोडवर शेती विकत घेऊन ही मिरची लागवड केली आहे, मिरची तोडण्याचे आता प्रयत्न 8 तोडे झाले त्यासाठी 40 महिला मजूर दररोज शेतात आहे, शिवाय 10 सालदार, आहेत शेतातून दररोज तीन टॅक्टर मिरची विक्री साठी गावातील व्यापाऱ्याला देण्यात येते शिवाय त्याचे पैसे सुध्दा नगदी घेतो असे पठाण यांनी सांगितले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा