maharashtra day, workers day, shivshahi news,

स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या ३६ विद्यार्थ्यांची ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ मध्ये निवड

कॅम्पस इंटरव्युद्वारे तब्बल ३६ विद्यार्थ्यांची निवड 
Selection of multinational and reputed company Tata Consultancy Services , Gopalpur , pandharpur , shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, जिल्हा प्रतिनिधी हूसेन मुलानी पंढरपूर
पंढरपूरःगोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस)’ या बहुराष्ट्रीय कंपनीने घेतलेल्या कॅम्पस इंटरव्युद्वारे तब्बल ३६ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी दिली.
         'टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस' या बहुराष्ट्रीय व  नामांकित कंपनीच्या निवड समितीने गोपाळपूर येथील स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यांनी या निवड प्रक्रियेच्या अंतिम फेरीतून तब्बल ३६ विद्यार्थ्यांची टीसीएस निंजा ऑफर्ससाठी निवड केली. विद्यार्थ्यांच्या गुणात्मक अभ्यासाबरोबरच शिस्त, आदरयुक्त संबंध व उत्कृष्ट शिक्षण पध्दती यामुळे निवड समिती अत्यंत प्रभावित झाली.


 त्यांनी या निवड प्रक्रियेतून वैष्णवी दिगंबर वाळके, शिवानी रामदास आटकळे, रितिका सैनी, वेदांगी मंगेश भुजंग, आदित्य भागवत केसकर, कुणाल बाळासाहेब शेटे, मयुरी सोमनाथ स्वामी, रविराज धोंडाप्पा कुडाळ, अजित सूर्यकांत गायकवाड, उमेश विकास साठे, राहुल किसन गपाट, सुशांत मुकेश सुलाखे, ओंकार अजितकुमार काळे, दीक्षा दीपक आदमिले, निकिता नागनाथ पवार, गणेश निलप्पा रुपनर, प्रतीक्षा उद्धव पाटील, अनिकेत राजमहेंद्र मिठ्ठा, शुभम गुलाबराव शेंडे, रोहित दत्तात्रय कवितके, स्वप्निल भारत मोरे, शुभम गोरख शेंडे, भुषण सतीश देशमुख, गौरव शिवाजी घायतिडक, किरण रावसाहेब ऐगळे, माधुरी विलास डोंगरे, महेश सुनील देशमुख, माऊली संजय तळेकर, नेहा बाबासाहेब कदम, प्रतीक गोरख माळी, संकेत संभाजी बोडके, सौरभ विशाल शेंडे, अक्षय प्रवीण हेतीया.

 अमृता कामराज डोंगरे, ओंकार अमसिद्ध बिराजदार व विशाखा विजयकुमार सावळकर असे मिळून स्वेरीच्या एकूण ३६ विद्यार्थ्यांची निवड केली. 'टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस' ही कंपनी जगातील बहुतांश देशामध्ये आपली सेवा देत आहे. या नामांकित कंपनीमध्ये ६ लाखांपेक्षा अधिक कर्मचारी काम करत आहेत. ही कंपनी प्रत्येक वर्षी स्वेरीच्या विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध करून देते. त्याचबरोबर 'टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस' या  कंपनीचे अधिकारी वेळोवेळी स्वेरीच्या विद्यार्थ्यांना कार्पोरेट कल्चर, सॉफ्ट स्कील अशा विषयावर मार्गदर्शन करत असतात. १९९८ साली स्थापन झालेल्या स्वेरी अभियांत्रिकीमध्ये विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्या प्लेसमेंट साठी येत असतात आणि कंपनीसाठी पात्र अशा विद्यार्थ्यांची निवड करत असतात. त्यामुळे विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये येथील विद्यार्थी आपले उत्तम करिअर घडवीत आहेत. या विद्यार्थ्यांना स्वेरी मध्ये विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. 

त्यामध्ये अॅप्टिट्यूड, कम्युनिकेशन स्किल, एडवॉन्स टेक्निकल ट्रेनिंग, मॉक इंटरव्यूव, ग्रुप डिस्कशन, सॉफ्टवेअर ट्रेनींग या व्यतिरिक्त जागतिक स्तरावर संधी मिळण्यासाठी जापनीज लैंग्वेज ट्रेनींग तसेच जीआरई, टोफेल या संदर्भात मार्गदर्शन केले जाते. सदर विद्यार्थ्यांना ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागातील तज्ञ प्राध्यापकांचे व विभागातील प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध होत असल्याने विशेषतः पालक वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, उपाध्यक्ष हनीफ शेख तसेच संस्थेचे विश्वस्त व पदाधिकारी, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम.पवार, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह पालकांनी ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’या कंपनीमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यूमधून निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !