शिवराज मोरे यांचा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंचोली च्या वतीने आज सत्कार
शिवशाही वृत्तसेवा,नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटुंरकर
अंचोली सारख्या छोट्याशा गावात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंचोली येथून पहिली ते सहावी पर्यंतचे शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षेत यशस्वी होऊन उच्च पदावर पोहोचलेल्या शिवराज मोरे यांचा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंचोली च्या वतीने आज सत्कार करण्यात आला. कठीण परिश्रम आणि दुर्दम्य इच्छाशक्ती याच्या बळावर इयत्ता दहावीत दोन वेळा नापास झालेल्या शिवराज मोरे नी प्रशासकीय सेवेत यशस्वी पदार्पण केले आहे. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन आई-वडिलांचे व गावकऱ्यांचे स्वप्न साकार केले आहे. या यशामध्ये त्याचे आई- वडील, गुरुजन, मोठा भाऊ माधव मोरे यांचा सिंहाचा वाटा आहे.
यावेळी शाळेत शिवराजने आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी कठीण परिश्रम करण्याचा महत्त्वाचा संदेश दिला. यापुढे आपल्या शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी अधिकारी होण्याचे स्वप्न ठेवून प्रत्यक्ष साकार करण्याचा प्रयत्न करावा असाही त्यांनी संदेश दिला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून केंद्रप्रमुख आर. एन चिखलवाड सर, सरपंच प्रतिनिधी अशोक पाटील मोरे, जि. प. प्रा. शाळेचे मुख्याध्यापक उत्तम गायकवाड, नरंगल शाळेचे मुख्याध्यापक एम टी मोरे, सहशिक्षक भारत घोरपडे, स्वाती अडबलवार मॅडम, गावातील प्रतिष्ठित नागरिक, शिवराज चे युवा मित्र उपस्थित होते
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा