जिल्हा परिषद हायस्कूल येताळा च्या वतीने
अशोक कांबळे शिक्षकांना दिला निरोप.
शिवशाही वृत्तसेवा, जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
तालुक्यातील जिल्हा परिषद हायस्कूल येताळा येथिल माध्यमिक शिक्षक अशोक तुळशिराम कांबळे हे तब्बल ३७ वर्षाची प्रदीर्घ सेवा करून काल ३० जुन रोजी सेवानिवृत्त झाल्यामुळे शाळेच्या वतीने सेवापुर्ती सोहळ्याचे आयोजन करुन सपत्नीक सत्कार केला.यावेळी कार्यक्रमांचे अध्यक्ष
शालेय समिती अध्यक्ष साईनाथ मुतनवाड, होते तर प्रमुख पाहुणे करखेली गट शिक्षण विस्तार अधिकारी पावडे, केंद्र प्रमुख संजय कदम, केंद्रीय मुख्याध्यापक हंगरगेकर,लाॅ काॅलेज सेवानिवृत प्राचार्य विठ्ठल रेड्डी कोपलोड, कुलकर्णी सर,तोगरवाड सर , खानापूर सरपंच प्रतिनिधी गौतम वाघमारे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक रमेश वाघमारे, सेवानिवृत्त कामगार प्रमुख रमेश वाघमारे , बहुभाषिक पत्रकार संघाचे अध्यक्ष गंगाधर धडेकर, युवा पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
माध्यमिक शिक्षक अशोक कांबळे यांनी ऊन वारा पाऊस यांची तमा न बाळगता करकाळा, चिंचोली, धर्माबाद,येताळा येथे आपल्या यशस्वी कारकिर्दीची ३७ वर्ष प्रदीर्घ सेवा केले.विद्यार्थ्यांना शालेय क्रीडा सांस्कृतिक शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी मोठे योगदान दिले, एक कर्तव्यदक्ष वक्ता आणि स्वच्छ प्रतिमेचे विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून त्यांचे नाव होते सदरील कार्याची दखल घेऊन शासनाने २०१७ मध्ये नांदेड जिल्हा शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.तर धर्माबाद नगर पालिकांच्या वतीने २०१८ मध्ये गुरुगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी शिध्दार्थ वाघमारे, पिराजी सोनकांबळे, किशनराव सोनकांबळे,समृत कांबळे, गंगाधर वाघमारे , राष्ट्रपाल वाघमारे,सुरज कांबळे, उत्तम सोनकांबळे, शाळेतील शिक्षक केदार जी.वाय,येळवतकर जी.ए,पेटेकर बालाजी, जोशी एस.एम,मोकमोड एन.पी,ढेपाळे एच.बी,सौ.मठपती एस.एम,सौ.कोटगिरे व्हि.एच,काचावार व्हि.जी, पोलिस पाटील पोतन्ना जोगे, गोपाळ आर्गे यांच्या सह अनेकांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन कोषकेवार पोशट्टी यांनी केले.
यावेळी शालेय व्यवस्थापन समिती शिक्षक शिक्षीका विद्यार्थी, स्नेही मित्र पाहुणे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा