श्री सिद्धनाथ विद्यालय सातवा मैल कासेगाव येथील विद्यार्थी रमले भजनात
शिवशाही वृत्तसेवा, जिल्हा प्रतिनिधी खर्डी
पंढरपूर तालुका कासेगाव येथील पांडुरंग शिक्षण प्रसारक मंडळ पंढरपूर संचलित श्री सिद्धनाथ विद्यालय सातवा मैल कासेगाव येथे दिंडीचे आयोजन करण्यात आलं होतं. विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा करून विठ्ठल भक्ती गीत रमलेले दिसून आले. यावेळी विद्यार्थ्यांनी टाळ, मृदुंग, पताका घेऊन विठ्ठल नामाचा गजर केला.यावेळी फुगडी खेळताना मुलींच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला महाराष्ट्रातली आध्यात्मिक संस्कृती जतन आणि संवर्धन करत विद्यार्थी प्रत्यक्ष सहभागी झाले यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक जयंत आयाचीत सहशिक्षक परमेश्वर झांबरे, सिकंदर पटेल, सदाशिव मोटे, अजय पवार, पिंकी डांगे,स्वप्नाली रोंगे, हौसाबाई खताळ, व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा