गुरुपौर्णिमेनिमित्त येवती येथे विविध कार्यक्रमाचे भव्य आयोजन
शिवशाही वृत्तसेवा,जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील येवती येथील श्री.श्री.प.पु.सद्रगुरु नराशाम महाराज मठ संस्थान (लघु आंळदी) या.मुखेड येथे सोमवार दि.03जुलै 2023रोजी गुरुपौर्णिमे निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.श्री श्री सद्रगुरु नराशाम महाराज यांच्या उपस्थितीत हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे .या दिवशी गुरुमंञाचा (गुरु उपदेशाचा) कार्यक्रम आहे.भाविक भक्तासाठी 2.वा महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार आहे.या सोहळ्यात भाविकांनी सहभागा घ्यावा.
असे आवाहन संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे. गुरु पौर्णिमेचे महत्व सर्वांच्या भावनेचे असताना तेव्हा या होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये सर्व भाविक भक्तांनी महाप्रसादाचे लाभ घेण्यासाठी उपस्थित राहावे आणि गुरु मंत्राचा देखील उपदेश या कार्यक्रमात असून ते देखील आपले कान तृप्त होण्यासाठी आणि विचार ऐकण्यासाठी या गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात उपस्थित राहावे असेही नम्र आवाहन करण्यात आले आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा