बर्की चौक ते मन्यार गल्ली देगलूर नाक्याकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम तात्काळ चालू करा
शिवशाही वृत्तसेवा, जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या हद्दीतील बर्की चौक ते मन्यार गल्ली देगलूर नाक्याकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याचे काम खोदून ठेवल्यामुळे काल झालेल्या पावसामुळे या रस्त्यावर अक्षरशा तळ्याचे स्वरूप आले आहे.
त्यामुळे या परिसरातील हा रस्ता रहदारीचा असल्यामुळे या रस्त्यावरून येता करताना परिसरातील जनतेला विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना व ज्येष्ठ नागरिकांना पायी चालणे देखील कठीण झाले आहे.
त्यामुळे या रस्त्याचे काम तात्काळ चालू करून नागरिकांना होणारा त्रास दूर करावा अशी मागणी विक्रम पाटील बामणीकर शिवसेना उपशहर प्रमुख नांदेड दक्षिण यांनी आयुक्त साहेब नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड यांच्याकडे एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात.
बर्की चौक ते मण्यार गल्ली देगलूर नाक्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर काल झालेल्या पावसामुळे अक्षरशा तळ्याचे स्वरूप आले आहे त्यातून मार्ग काढताना नागरिकांना आपला जीव मोठे घेऊन या रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे त्यात पावसाळा सुरू झाल्यामुळे या साचलेल्या पाण्यामुळे अनेक रोगांना निमंत्रण आहे का ? असे या भागातील नागरिक बोलून दाखवत आहेत त्यासाठी या रस्त्याच्या दुरुस्तीच्या नावाखाली हा रस्ता पूर्ण खोदून ठेवला आहे त्यामुळे या रस्त्यावर पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे यातून प्रवास करणाऱ्या ऑटो चालक मोटार सायकल यांना रस्त्यात पाणी किती खोल आहे याचा अंदाज देखील लावता येत नाही.
त्यामुळे हा रस्ता तात्काळ दुरुस्त करण्यात यावा रस्त्या अभावी होणारी नागरिकांची हेडसाळ तात्काळ थांबवण्यात यावी. साचलेल्या पाण्यामुळे दुर्गंधी देखील पसरत आहे त्यात अनेक रोग होण्याची भीती निर्माण होत आहे.
त्यासाठी नांदेड शहरातील खोदून ठेवलेला रस्ता दुरुस्तीचे काम तात्काळ चालू करण्यात यावे या रस्त्याचे काम आठ दिवसांच्या आत चालू न केल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेनेच्या वतीने विक्रम पाटील बामणीकर शिवसेना उपशहर प्रमुख यांनी नुकताच मा.आयुक्त साहेब यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीची तात्काळ नोंद घ्यावी आणि नागरिकांचा होणारा त्रास कमी करावा असेही बामणीकर यांनी म्हटले आहे.
------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा