गावातील महिलानी पुरुषांच्या मदतीने दारूच्या
अड्ड्यावर घातली धाड
शिवशाही वृत्तसेवा, जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
हदगाव तालुक्यातील मनाठा पोलीस स्टेशन हद्दीत असणाऱ्या कृष्णापुर गावात खुलेआम पणे देशी दारूची विक्री काही दिवसापासून चालू आहे यात येथील तरुण पिढी व नागरिक मोठ्या प्रमाणात दारूच्या आहारी गेल्याने येथील गावातील महिलानी पुरुषांच्या मदतीने दारूच्या अड्डा असणाऱ्या ठिकाणी जाऊन तिथे चालू असणाऱ्या देशी विक्री करत असणाऱ्या ठिकाणावर धाड मारून यात देशी दारूच्या बाटल्या जप्त करून मनाठा पोलीस स्टेशन येथे संपर्क साधून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. यावेळी गावातील महिला व पुरुष मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
अवैधरित्या देशी दारूची विक्री होत असताना याबाबत अनेक वेळा दारूबंदी अधिकारी व पोलीस स्टेशनला कळविल्यानंतरही पोलिसांनी कुठलीच कारवाई केली नसल्यामुळे सदर गावातील महिलांनी पुढाकार घेऊन देशी दारूचे दुकान उध्वस्त केले आहे याबाबत रगरागिनी महिलांच्या एकजुटीमुळे दारूचे दुकान बंद पडलेले आहे. एवढी सत्यता नाकारता येत नाही.----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा