कै. अनुसया माधवराव जुन्ने यांचे प्रथम पुण्यस्मरण
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
तालुक्यातील मौजे कोकलेगाव येथे कै. अनुसया माधवराव जुन्ने यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ गुरुवार दि. 08 जून रोजी झी.टाॅकीज फेम महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प. विलास महाराज गेजगे(बोचीकर) यांच्या किर्तन सेवेचे आयोजन करण्यात आले आहे.
कोकलेगाव येथील माजी पंचायत समीती सभापती गजानन पाटिल जुन्ने यांच्या मातोश्री कै.अनुसयाबाई माधवराव पाटिल जुन्ने यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ दि.08 जून रोजी तालूक्यातील मौजे कोकलेगाव येथे सकाळी ठिक 08:30 वाजता येथील हानुमान मंदिर येथे झी.टाॅकीज फेम महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध किर्तनकार विलास महाराज गेजगे (बोचीकर) यांच्या किर्तन सेवेचे आयोजन करण्यात आले असून सदर किर्तन सेवेचा पंचक्रोशीतील भाविक भक्तानी घेण्याचे अव्हान माजी उपसभापती गजानन पाटिल जुन्ने, किशनराव पाटिल जुन्ने, भगवान पाटिल जुन्ने, जुन्ने पाटिल परिवार व समस्त कोकलेगाव वासियांच्या वतीने करण्यात आले आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा